जे.के.इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या वतीने भोपर गावात  विद्यार्थ्यांनी काढली विठूरायाची दिंडी...



 डोंबिवली :शंकर जाधव -   आषाढी एकादशी निमित्त डोंबिवलीजवळील भोपर गावात धर्मा चॅरीटेबल ट्रस्ट आणि जे. के. पाटील इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या वतीने गावात विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीत विठूरायाच गजर करण्यात आला. विद्यार्थ्यानी गावात काढलेल्या दिंडीत गावकरी सहभागी झाले होते. त्यामुळे भोपर गावात पंढरपुर झाल्याचे वातावरण दिसले. 

  जे. के. पाटील इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज संचालक गजाजन पाटील, मुख्याध्यापिका मंजुळा पाटील, माजी सरपंच काळू बुवा मढवी, वामनबाबा आश्रमातील सेवेकरी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीत विठू नामाच्या गजराने भोपर गाव दुमदुमले. या दिंडी काढली असून २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणाऱ्या आनंदाचे छायाचित्रण गावकऱ्यांनी केले. गावातील विठ्ठलरखुमाई मंदिराच्या प्रांगणात विद्यार्थ्यांची दिंडी क्षणभरासाठी स्थिरावल्यावर फुगडी –लेझीम यात दंग झाली.गावातून दिंडी पुढे मारुतीच्या देवळासमोर आल्यावर वारकरी झालेल्या विद्यार्थ्यांनी फेर धरून विठू नामाचा जयजयकार केला. विठू नामाच्या गजरात टाळच्या तालावर हरीश पंढरीनाथ मढवी यांच्या मृदुंगावर  पावले टाकत गावातून गेली. संत ज्ञानेश्वर, तुकराम, मुक्ताबाई, बहिणाबाई, जनाबाई, नामदेव इत्यादी  संत झालेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईलने फोटो काढण्यास गावकऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी शाळेचे संस्थापक गजाजन पाटील म्हणाले,वारकरी संप्रदायाशी जरी मी निगडीत असलो तरी आजवर कधीही वारीला गेलो नाही.अनेक वेळेला असे वाटत होते कि अशी दिंडी काढावी. परंतु कामाचा व्यापात दिंडी काढणे राहून जात होते. परंतु  विठ्ठल कृपेने तो योग जुळून आला. वारीला न जाता वारीत सहभागी झाल्याचा अत्यानंद झाला. यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांचे पालक , शाळेतील शिक्षक आणि व्यवस्थापन समिती सहकार्य केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post