डोंबिवलीत स्थानक अवतरली अवघी पंढरी 



डोंबिवली :- ( शंकर जाधव  )  आषाढी एकादशीला पंढरीची वारी करण्याची अनेक भाविकांची इच्छा पुर्ण होत नाही. अश्या भाविकांसाठी दरवर्षी प्रमाणे दिव्यांच्या हरिओम रेल्वे प्रवासी मंडळाच्या वतीने डोंबिवली स्थानकात आषाढी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यामुळे डोंबिवली स्थानकात जणू पंढरी अवतरली होती. शुक्रवारी सकाळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करण्यात आली. डोंबिवली, कल्याण, कोपर, ठाकुर्ली, इत्यादी उपनगरातील चाकरमान्यांनी लोकलमध्ये भजनी मंडळे सुरू केली आहेत. डोंबिवली येथून सकाळी ९.०६मिनिटांनी सुटणा-या लोकलमधील प्रवाशांनी हरिओम रेल्वे प्रवासी मंडळाची स्थापना केली आहे.
          डोंबिवली स्थानकात आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाची पूजा करण्याची संकल्पना पाच वर्षापूर्वी भजनी मंडळाच्या सदस्यांनी  मांडली होती.त्यास आता मूर्त स्वरुप येउ लागले आहे. आषाढी निमित्ताने उत्तम शिंदे, संतोष खानविलकर आदींनी तुळशीच्या पानाफुलांनी विठुरायाच्या भोवताली आकर्षक सजावट केली होती.या सोहळ्यात दिवसभर विविध भजनी मंडळी सहभागी झाली होती.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दोन दिवसापासून तयारी करण्यात येत असते.राजेंद्र टेमकर, रवींद्र टजमकर, संतोष पाठक, विरेंद्र लाड, संदेश सुर्वे, कृष्णा सावंत, विठ्ठल शेलार, शिवाजी देसाई, उत्तम जाधव, भिवा गावडे, प्रविण कांबळी, स्वप्नील खुळे, प्रथमेश आमरे, विजय दळवी, संतोष फाटक, विनायक शिंदे यांनी सोहळ्याचे  नियोजन केले.पहाटेपासून अनेक चाकरमान्यांनी, रेल्वे प्रवाशांनी नागरिकांनी विठुरायाचे दर्शन घेतले.तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम, मनसे गटनेते  मंदार हळबे, हेमंत दाभोळकर, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख डोंबिवली पश्चिम भाई पावडीकर, कक्षप्रमुख नितीन पवार,  युवा सेनेचे विभाग अधिकारी  पवन म्हात्रे  आदीसह अनेक पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली स्थानकात विठ्ठलाचे दर्शन घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post