दीड वर्षाच्या मुलाचे लाड पुरवण्यासाठी बापानेच दिली खरी खुरी पिस्तुल

टिटवाळा :  मुलगा रडत होता म्हणून बापानेच  आपल्या मुलाच्या हातात एक चक्क खरीखुरी पिस्तुल चिमुरड्या मुलाच्या हातात दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर वायर झाला आहे.  सुरुवातीला हा व्हिडीओ  टिटवाळा येथील असल्याचा दावा केला जात होता. मात्र अधिक माहिती घेतली असता  टिटवाळा येथील  ग्रेटर वेली या शाळेचे ट्रस्टी असलेले आदर्श उपाध्याय हे आपल्या दीड वर्षाच्या मुलाला पिस्तुल लोड करायला शिकवत असल्याच्या व्हिडीओ  टिटवाळयाचा नसून दिल्लीचा असल्याचे समजले.
याबाबत टिटवाळा पोलीस स्टेशनला चौकशी  केली असता तेथील पोलीस निरीक्षक  बालजी पांढरे यांनी सदर प्रकार हा सोशल मिडीयावर वायरल झाला असून याबाबतची सत्यता पडताळणी चालू आहे असे सांगितले. हा व्हिडीओ बनवणाऱ्या ग्रेटर वेली या शाळेचे ट्रस्टी असलेले आदर्श उपाध्याय यांना संपर्क केला असता  हा व्हिडीओ  नैनिताल दिल्ली या ठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत फिरायला गेले असताना आपला दीड वर्षाचा लहान मुलगा हा माझ्या हाततल्या रिव्हाल्वरला खेळणे समजून  घेण्यासाठी रडत होता . म्हणून मी ते त्याला ते लॉक करून दिले आणि लगेच त्याच्या हातातून काढून असल्याची त्यांनी कबुली दिली आहे.  सोशल मिडीयावर याबद्दल टीकेची झोड उठल्यानंतर उपाध्याय यांनी ही माझी चूक होती त्याबद्दल मला पश्चाताप असून माफी मागत असल्याच त्याने सांगितले आहे.
            
मात्र झालेल्या प्रकारची त्यांनी जरी माफी मागितली असली तरी . केवळ मुलगा तडतो म्हणून दीड वर्षाच्या मुलाच्या हातात रीव्हाल्वर देणे हे किती महागात पडू शकते . याचा विचारच न केलेला बरा. यातून घडू नये असा अनर्थ जर घडला असता तर केवळ सोशल मिडीयावर चर्चेत राहण्यासाठी हटके काहीतरी करत व्हिडीओ अपलोड करण्याचा मोह हा एखाद्याच्या जीवावरही बेतू शकतो .  

1 Comments

  1. Dr.engg,adv.karayche asta he tar direct bahubali karta ... very sad n bad...

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post