डहाणू : (निलेश कासट ):-पालघर जिल्ह्यात आज जवळपास ३ वाजता पासून विजांच्या कडकडाटा सह आणि ढगांच्या गडगडाटा सह पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. दरम्यान आज संध्याकाळी चार ते सव्वा चार वाजताच्या दरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडल्यानं २ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
पहिल्या घटनेत पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या तवा गावात साईबाबा मंदिरा जवळ अंगावर वीज पडून नितेश तुंबडा या २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झालाय तर अनिल धिंडा हा एक जण जखमी झाला आहे.जखमीवर धुंदलवाडी मधल्या वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचार असून मयत नितेश तुंबडा याचं शव तलासरीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं आहे.
तर दुसऱ्या घटनेत वाडा तालुक्यातल्या आंबिस्ते इथं एका वस्तीवर वीज पडल्यानं शांताराम दिवा या एका तरुणाचा मृत्यू झालाय तर ५ तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाणीवली रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Post a Comment