डोंबिवलीत पार पडलेल्या आगरी समाजाच्या बैठकीत  बाचाबाची ..
डोंबिवली( शंकर जाधव): आगरी महोत्सव समाजीमुख व्हावा अशी मागणी करत मंगळवारी डोंबिवली जवळील निळजे गावातील ज्येष्ठ नागरिक भवन  सभागृहात पार पडलेल्या बैठकीत  समाजातील दोन व्यक्तिमध्ये जोरदार वाद झाला.या वादाचे पर्यवसन हाणामारीत होणार होते.मात्र काही उपस्थित मान्यवरांनी हस्तक्षेप केल्याने मारामारी टळली. 
 बैठकीच्या सुरुवातीला ही सभा शांत पार पडली पाहिजे असे उपस्थित मान्यवरांनी सूचित केले होते.परंतु काही मान्यवरांचे भाषण झाल्यावर वाद सुरू झाला. बैठकीत आलेल्या दोन व्यक्तींमध्ये मतभेद झाल्याने ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते.

Post a Comment

Previous Post Next Post