राया येथे झालेल्या  महिलेच्या खुनाचा आरोपी अटक

अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला होता  महिलेचा मृतदेह




टिटवाळा :- २३ जुन रोजी सकाळी १०: १५ च्या सुमारास वाजण्याच्या सुमारास अर्धवट  जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह  टिटवाळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत  राया गाव परिसरातील ब्रिज खाली  दि  आढळून आल्याने  एकच खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रा. आणि कल्याण तालुक पोलि ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी संयुक्त पथके तयार करून मोठ्या शिताफिने आरोपीला पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , मयत महिला मोनी हिचे मुळचा पश्चिम बंगाल येथील रहिवाशी असलेल्या आणि टिटवाळा नजीकच्या बनलेती चिकन विक्रेता असलेल्या आरोपी आलम शेख याच्याशी ३ -४ महिन्यापुर्वी ओळख झाली होती. यातून त्यांच्यात जवळीकता निर्माण होउन प्रेमसंबंध अनैतिक संबध तयार झाले. मयत मोनी हिने याच संबधाचा फायदा घेत आलम शेख याच्याकडुन २५०००० रुपये घेतले होते. आलेम शेख हा वारंवार त्याने दिलेले पैसे मागत होता मात्र मोनी ते देण्यास टाळाटाळ करत होती. अखेर जाने आलम शेख यान तिचा काटा काढायचे ठरवले. त्याने आपला मित्र मनोरुद्दीन शेख याच्या मदतीने दिनांक २२ जुन २०१९ रोजी रात्रीच्या सुमारास मोनी हिच्या खडवली येथील राहत्या घरी मफलरने गळा आवळुन हत्या केली.
कुठलेही ठोस पुरावे नसताना स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रा. आणि कल्याण तालुक पोलि ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी बारकाईने आपल्या तपासाची यंत्रणा कामाला लावली . मृतदेह ज्या गोणीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता त्या गोणीला मोठ्या प्रमाणांत कोंबडीची पिसे लागलेली आढळुन आली . तसेच मयत मोनी हिच्या कंबरेला बांधलेल्या तावीजवर बंगाली भाषेत मजुकर होता. यावरुन मयत महिला ही पश्चिम बंगालमधील रहिवाशी असावी असा अंदाज बांधण्यात आला. तसेच गोणीत सापडलेली कोंबडीची पिसे यावरून चिकन सेंटरशी सबंधित व्यक्ती या गुन्ह्यात असावी असा प्राथमिक अंदाज लावत खबरी मार्फत अधिक माहिती काढण्यास सांगितल्यानंतर टिटवाळा नजीकच्या बनेली येथील चिकन सेंटर चालविणारा जाने आलम शेख याला एक महिला वारंवार भेटायला येत होती अशी माहिती मिळाली. तसेच जाने आलम शेख हा सदर घटना घडलेल्या कालावधीत अचानक पश्चिम बंगालमध्ये गेल्याचे समजले . याच आधारावर पोलिसांनी शोध घेत त्यला ताब्यात घेउन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली . त्याला पोलिसांनी अटक केली असुन उद्या त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. तर त्याचा दुसरा साथीदार मनोरुद्दीन याचा शोध सुरु आहे.

ठाणे ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड , अपर पोलिस अधिक्षक संजय कुमार पाटील आणि आर . आर . गायवाड , उप विभा. पो. अधिकारी , मुरबाड विभाग तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी निरीक्षक व्यंकट आंधळे आणि कल्याण तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक बालाजी पांढरे , सपोनि बडाख  , पोउपनि अभिजीत टेलर, पोउपनि जितेंद्र अहिरराव , बजरंग राजपुत यांसह इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही कामगिरी केली आहे.

1 Comments

  1. Titwala poilce va Maharashtra police yenche khup abhar,kami vel madhye tumhi case solve kele.....Jai Hind.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post