*डोंबिवली :- ( शंकर जाधव )* अतिवृष्टीने कोल्हापूर आणि सांगली येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. येथील पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून सर्व क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. कोपर गाव येथील जनसंपर्क कार्यालयात नगरसेवक म्हात्रे यांनी पूरग्रस्तांना देण्यात येणारे सामान एकत्र करून ते समान कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे.पूरग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना सदैव राहील असे नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले.
तांदूळ, गहू, वाटाणे, चा वळी, ब्लांकेट, तेल,तुरडाळ, चना डाळ, मुगडाळ, मसूरडाळ, नवीन साड्या, साखर,चहा पावडर, टूथपेस्ट, मीठ, बिस्किटे , वह्या,लहान मुलाचे कपडे, धोतर इत्यादी सामानाने भरलेले दोन टेम्पो कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे.शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी स्वतः समान एकत्र करण्यासाठी कोपरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात आले होते. यावेळी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले,पूरपरिस्थितीमुले कोल्हापूर येथील नागरिकांचे संसार उध्वस्त झाले.या पूरग्रस्तांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी शिवसेना सदैव त्यांच्या पाठीशी उभी आहे. आमची ईश्वराकडे प्राथर्ना करतो कि, त्यांना नैसगिक संकटात धीर खचू न जाता त्यांचे जीवन पुन्हा नव्याने उभे राहू दे. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख अनिल बळीराम म्हात्रे, संदीप गोडांगे,संजय म्हात्रे,अरुण म्हात्रे,ज्ञानबा म्हात्रे, रमेश पाले, राजेश पाचकुडे, विनोद म्हात्रे, दीपक जोशी, पांडुरंग म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, शशिकांत देसाई, सुनील म्हात्रे, सुर्यकांत म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, बाळू म्हात्रे,दिलीप म्हात्रे, शेखर खेडेकर, विनायक मोरे, श्रीक तेलंग, त्रिवेदी म्हात्रे, कांता म्हात्रे, सपना शहा, वेदिका म्हात्रे, जयश्री म्हात्रे, आदिती भातदे, शेखर खेडेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment