कर्जत प्रतिनिधी :- नितिन पारधी
कर्जत तालुक्याचे पहिले आमदार असलेले मनोहर कुशाबा पादिर यांच्या गावाला जाणारा रस्ता खड्डेमय झाला आहे.माजी आमदार पादिर यांची जयंती असल्याने स्थानिक ओलमण ग्रामस्थांनी मातीचे ट्रॅक्टर भरून आणत रस्त्यावर लाल माती पसरवली.शासन काही करीत नसल्याने ग्रामस्थांनी श्रमदान करून ही नवीन संकल्पना राबवून आपल्या तालुक्याच्या पहिल्या आमदारांना श्रद्धांजली वाहिली.
कर्जत तालुक्यातील पहिले आमदार मनोहर कुशाबा पादिर हे तालुक्यातील ओलमण गावातील रहिवासी होते.त्यांनी 1956 मध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर पादिर यांनी भरीव काम कर्जत तालुक्यासाठी केले.त्या माजी आमदार दिवंगत मनोहर कुशाबा पादिर यांच्या गावाला जाणारा रस्ता 12 वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून बनविला होता.कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्याने ओलमण गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहने काय रस्त्याने चालणे देखील कठीण होऊन बसले आहे.त्यावर मार्ग काढावा आणि शासनाने रस्त्याचे नव्याने मजबुतीकरण करावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे.परंतु शासन त्या मागणी कडे लक्ष देत नसल्याने अखेर स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी आमदार मनोहर कुशाबा पादिर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिकांनी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी लाल माती ट्रॅक्टर मधून आणून रस्त्याच्या मधोमध ओतण्यात येत होती.तर स्थानिक ओलमण,बोरीचीवाडी मधील आदिवासी ग्रामस्थ आणि तरुण हर रस्त्यावर माती पसरवण्याचे काम कडून आपल्या भागातील नेत्याची जयंती साजरी करीत होते.ही वेळ शासनाने स्थानिक जनतेवर आल्याची तिखट प्रतिक्रिया ओलमण बोरगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि माजी आमदार पादिर यांचे सुपुत्र दादा पादिर यांनी व्यक्त केली आहे.12 वर्षांपूर्वी शासनाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून केलेला रस्ता मातीत हरवून गेला असून या रस्त्याने प्रवास करणारे पलीकडील भागातील ग्रामस्थ हे शासनाच्या दुर्लक्षपणाबद्दल उघड नाराजी व्यक्त करीत आहेत.
Post a Comment