कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज तब्बल ४०९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन मृत्यू झाला आहे.
आजच्या या ४०९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६६,५२२ झाली आहे. यामध्ये २८८८ रुग्ण उपचार घेत असून ६२,४५४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४०९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-५५, कल्याण प – १२४, डोंबिवली पूर्व –१५०, डोंबिवली प – ५९, मांडा टिटवाळा – १४, तर मोहना येथील ७ रुग्णांचा समावेश आहे.
Post a Comment