रोशन उबाळे - कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन
पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये दुकाने
सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्यास आणि शनिवार,
रविवारी पी१, पि२ प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी
दिले आहेत.
आज शनिवार असल्याने रस्त्याची नेमकी कोणती बाजू पी १ आणि पी २ प्रमाणे सुरु ठेवायची याची पूर्ण माहिती केडीएमसी अधिकाऱ्यांनाच नसल्याने याबाबत अधिकारी संभ्रमात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. तर काल आम्हाला आज पी१ प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास सांगितले, मात्र आज सकाळी येऊन दुकाने बंद करण्यास सांगितल्याने व्यापारी देखील चांगलेच संतप्त झाले आहेत. दरम्यान व्यापारी पालिका प्रशासन आणि पोलिसांकडे संभ्रम दूर करण्याची मागणी करण्यात आली .
Post a Comment