*कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क प्रभाग क्षेत्रातील जीन्स पॅन्टच्या कारखान्यांवर निष्कासनाची धडक कारवाई !* 2

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क प्रभाग क्षेत्र परिसरात अवैधरित्या कार्यरत असलेल्या जीन्स वॉशिंग कारखान्यावर निष्ठा सणाची धडक कारवाई करण्यात आली. जीन्स वॉशिंग उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, या अवैधरित्या चालू असलेल्या जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाई करणे बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली होती. या पत्राची त्वरित दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अशाप्रकारे अनधिकृतरित्या महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या जीन्स कारखान्यांवर वर निष्कासनाची धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त यांना दिले होते. त्यानुसार शनिवारी सकाळी सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे आणि सुधीर मोकल यांनी विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदवाडी परिसरातील दोन ते तीन हजार स्क्वेअर फुटाचे चार कारखाने निष्कासित करण्यात आले. या धडक कारवाई करिता 3 जेसीबी आणि प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित करण्यात आले. सदर परिसर संवेदनशील असल्यामुळे महापालिकेच्या विनंतीनुसार या कारवाईसाठी परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. सुमारे पंचवीस ते तीस पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे 15 पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने हे अनाधिकृत कारखाने पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post