डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवलीजवळील उंबार्ली गावालगत एका चारचाकी वाहनाची पोलिसांनी तपसणी केली असता तब्बल २७२ किलो वजनाचे अंमली पदार्थ आढळून आले. चारचाकी वाहनात दोन इसमांना पोलिसांनी अटक केली असून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फैसल फारूख ठाकुर ( २१, माझगांव, मुंबई ) मोहम्मद आतीफ हाफीज उल्ला अन्सारी (३२,रा. वर्षे रा.शांतीनगर, भिवंडी ) यांना अटक करण्यात आली. अटक आरोपींकडून ४७,७६,००० रुपये किमतीचा गांजा,चारचाकी वाहन व ८ मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.२६ जून रोजी डोंबिवलीजवळील उंबार्ली गावालगत मोकळ्या मैदानात फैजल आणि मोहम्मद हे दोघे चारचाकी वाहन घेऊ विक्रीसाठी आले असल्याची माहितीमानपाडा पोलिसांना मिळाली.सदर ठिकाणी पोलिसांनी चारचाकी वाहनातील दोघांना बेड्याठोकून अंमली पदार्थ जप्त केले.अटक आरोपींवर मानपाडा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क) २०(ब) (क) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक आरोपींकडे अंमली पदार्थ कोणी दिले, त्यांच्याकडे कुठून आले याची माहिती पोलीस घेत आहोत.
Post a Comment