निर्मल युथ फाउंडेशने दिला "निसर्ग खुलवू आनंदाने, खत बनवू निर्माल्याने" चा नारा
निर्मल युथ फाउंडेशनची पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी
निर्मल युथ फाउंडेशनची पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी
मुंबई डेटलाईन 24
टीम : निसर्गाने आपल्याला सर्व दिले आहे . स्वच्छ हवा , स्वच्छ पाणी , स्वच्छ सूर्यप्रकाश
आणि अन्न आपण निसर्गातूनच मिळवतो . या सर्व गोष्टी निसर्गाने कोणत्याही
परतफेडीची अपेक्षा न ठेवता मानवजातीला बहाल केल्या आहेत आणि आपण याबाबत निसर्गाचे
सदैव ऋणी आहोत . आपल्या हातून कळत आणि नकळत अनेक गोष्टी घडतात ज्यातून निसर्गाची
हानी होते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो . परिणामी ग्लोबल वॉर्मिंग आणि जल प्रदूषण , वायुप्रदूषण याचा
आपल्यालाच त्रास होतो . या सर्व बाबींचा खोलवर विचार करून कृतार्थ भावनेने या
निसर्गाच्या हानीला थांबवण्यासाठी खारीचा वाटा म्हणून " निर्मल युथ फाउंडेशन " या संस्थेअंतर्गत निर्माल्य गोळा करून त्याचा
पुनर्वापर करून निसर्गाला नवीन संजीवनी देण्याचा एक उल्लेखनीय प्रयत्न गणेशोत्सवादरम्यान
करण्यात आला .
या उत्सवादरम्यान अनेक
फुले , हार यांनी सजावट करतो जी विसर्जन करताना जवळच्या वाहत्या
पाण्यात किंवा कृत्रिम तलावांत सोडून दिली जातात. पण आपण यापुढचा विचार न करता परत
आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त होतो . कळत नकळतपणे आपण आपले पाण्याचे स्रोत
असलेले नदी , खाडी किंवा विहिरी आणि तलाव या निर्माल्यांनी दूषित करतो परिणामी
त्याचे विघटन होत नाही , पाणी प्रदूषित होते. महत्वाची बाब म्हणजे हे चक्र दरवर्षी असेच सुरु
राहते . हेच
लक्षात घेऊन आणि या बाबींचा बारकाईने विचार करून ‘निर्मल युथ फाउंडेशन संस्थे’ तर्फे हेच निर्माल्य आणि त्यासोबत पर्यायाने
येणारे प्लास्टिक पाण्याच्या स्रोतात मिसळू न देता त्याचा पुनर्वापर करून
सेंद्रीय खत निमिर्ती
साठी उपयोग करण्याला सुरुवात करण्यात
आली . श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणाऱ्या सर्व ठिकाणी , खाडीजवळ तसेच
कृत्रिम तलाव येथे संस्थे कडून
आवश्यक मनुष्यबळ पुरवून तसेच निर्माल्य गोळा
करण्यासाठी मास्क , ग्लोव्हस आणि इतर साहित्य वापरून ,
त्यांचे विघटनशील आणि
अविघटनशील असे वर्गीकरण करून हार फुले वेगळे आणि प्लास्टिक वेगळे करण्यात येते आणि निर्माल्य खत
निमिर्ती साठी पाठवले जाते व इतर कचऱ्याची योग्यरितीने विल्हेवाट लावण्यात येते .
अशा प्रकारे दीड दिवस , पाच दिवस , सात दिवस आणि अकरा दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी तसेच मधल्या
दिवसांत गणेश मंडळाच्या मंडप मधून येथून निर्माल्य गोळा केले जाते व जलस्तोत्रांत जाण्यापासून
वाचवन्यात येते .
निर्माल्य पुनर्वापराचे
संस्थेचे यंदाचे ३ रे वर्ष असून या वर्षी (महाराष्ट्र
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण) ( स्वच्छता निरीक्षक चिंतामण मानकर ) ( दीप अकादमीचे संस्थापक निलेश
अडकमोल ) (मा. नगरसेवक , मा. स्थायी समिती सभापति कल्याण जिल्हा युवा सेना अधिकारी दिपेश
म्हात्रे) (अध्यक्ष ,भा. ज. प. युवा मोर्चा पवन पाटील) ( क.डो.म.पा. घन कचरा व्यवस्थापन
विभाग, डोम्बिवली) यांच्यावतीने संस्थेच्या कार्याची दखल घेऊन संस्थेच्या या कार्यास हातभार लावला आणि पुढील वाटचालीसाठी
शुभेच्छा दिल्या.
डोंम्बिवली पश्चिम
येथील कोपर गाव , गणेश घाट जूनी डोम्बिवली , कुंभारखण पाडा , सातपुल जेट्टी , गणेश घाट रेतीबंदर
येथे निर्माल्य संकलन केंद्रे उभारण्यात आली होती . प्रत्येक केंद्रावर साधारण २५
तरुण स्वयंसेवक यांची टीम नेमण्यात आली होती. या श्री गणेश उत्सवात सुमारे ६० टन
निर्माल्य व १८ टन प्लास्टिक तसेच ६ टन इतर घन कचरा गोळा करण्यात आले व आपले जलसाठे
प्रदूषणविरहित ठेवण्यास व स्वच्छ पर्यावरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे
टाकण्यात आले . या कार्यात साउथ इंडियन असोसिएशन , प्रगति, के.वि.पेंढारकर या तीन महाविद्यालयाचे
NSS चे १५० स्वयंसेवक व निर्मल युथ फाउंडेशन चे ५० स्वयंसेवक सहभागी
होते.
"निसर्ग खुलवू
आनंदाने, खत बनवू निर्माल्याने" या ब्रीद वाक्यासोबत समाजिक भान जप्त
संस्थेने एक निसर्ग संवर्धनाचा मूलमंत्र दिला.
खुप छान उपक्रम
ReplyDeleteProud of being a part of this foundation ☺️☺️🌿
ReplyDelete.😻😻😻😻 Very precious work
ReplyDeletePost a Comment