निर्मल युथ फाउंडेशने दिला "निसर्ग खुलवू आनंदानेखत बनवू निर्माल्याने" चा नारा 
      निर्मल युथ फाउंडेशनची  पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी



मुंबई डेटलाईन 24 टीम :  निसर्गाने आपल्याला सर्व दिले आहे . स्वच्छ हवा , स्वच्छ पाणी , स्वच्छ सूर्यप्रकाश आणि  अन्न आपण निसर्गातूनच मिळवतो . या सर्व गोष्टी निसर्गाने कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मानवजातीला बहाल केल्या आहेत आणि आपण याबाबत निसर्गाचे सदैव ऋणी आहोत . आपल्या हातून कळत आणि नकळत अनेक गोष्टी घडतात ज्यातून निसर्गाची हानी होते आणि  पर्यावरणाचा समतोल बिघडतो . परिणामी ग्लोबल वॉर्मिंग आणि  जल  प्रदूषण , वायुप्रदूषण याचा आपल्यालाच त्रास होतो . या सर्व बाबींचा खोलवर विचार करून कृतार्थ भावनेने या निसर्गाच्या हानीला थांबवण्यासाठी खारीचा  वाटा म्हणून  " निर्मल युथ फाउंडेशन " या संस्थेअंतर्गत निर्माल्य  गोळा करून त्याचा पुनर्वापर करून निसर्गाला नवीन संजीवनी देण्याचा एक उल्लेखनीय प्रयत्न गणेशोत्सवादरम्यान करण्यात आला . 

या उत्सवादरम्यान अनेक फुले , हार यांनी सजावट करतो जी विसर्जन करताना  जवळच्या वाहत्या पाण्यात किंवा कृत्रिम तलावांत सोडून दिली जातात. पण आपण यापुढचा विचार न करता परत आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त होतो .  कळत नकळतपणे आपण आपले पाण्याचे स्रोत असलेले नदी , खाडी किंवा विहिरी आणि तलाव या निर्माल्यांनी दूषित करतो परिणामी त्याचे विघटन होत नाही , पाणी प्रदूषित होते. महत्वाची बाब म्हणजे  हे चक्र  दरवर्षी असेच सुरु राहते . हेच लक्षात घेऊन आणि या बाबींचा बारकाईने विचार करून  निर्मल युथ फाउंडेशन संस्थे’ तर्फे  हेच निर्माल्य आणि त्यासोबत पर्यायाने येणारे प्लास्टिक पाण्याच्या स्रोतात  मिसळू न देता त्याचा पुनर्वापर करून सेंद्रीय  खत निमिर्ती  साठी उपयोग करण्याला सुरुवात करण्यात आली . श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणाऱ्या सर्व ठिकाणी , खाडीजवळ तसेच कृत्रिम तलाव येथे संस्थे कडून  आवश्यक  मनुष्यबळ पुरवून तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी  मास्क , ग्लोव्हस  आणि इतर  साहित्य वापरून , त्यांचे  विघटनशील आणि अविघटनशील असे वर्गीकरण  करून हार फुले वेगळे आणि प्लास्टिक वेगळे  करण्यात येते  आणि निर्माल्य खत निमिर्ती साठी पाठवले जाते व इतर कचऱ्याची योग्यरितीने विल्हेवाट लावण्यात येते . अशा प्रकारे दीड दिवस , पाच दिवस , सात दिवस आणि अकरा दिवसांच्या  गणपती विसर्जनाच्या  दिवशी तसेच मधल्या दिवसांत गणेश मंडळाच्या मंडप मधून येथून निर्माल्य गोळा केले जाते व जलस्तोत्रांत  जाण्यापासून वाचवन्यात येते . 
निर्माल्य पुनर्वापराचे संस्थेचे यंदाचे ३ रे वर्ष असून या वर्षी    (महाराष्ट्र राज्यमंत्री  रवींद्र  चव्हाण)  ( स्वच्छता निरीक्षक चिंतामण मानकर ) ( दीप अकादमीचे संस्थापक निलेश अडकमोल ) (मा. नगरसेवक , मा. स्थायी समिती सभापति कल्याण जिल्हा युवा सेना अधिकारी दिपेश म्हात्रे) (अध्यक्ष ,भा. ज. प. युवा मोर्चा पवन पाटील) ( क.डो.म.पा. घन कचरा व्यवस्थापन विभाग, डोम्बिवली) यांच्यावतीने संस्थेच्या  कार्याची दखल घेऊन संस्थेच्या या कार्यास हातभार लावला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डोंम्बिवली पश्चिम येथील कोपर गाव , गणेश घाट जूनी डोम्बिवली , कुंभारखण पाडा , सातपुल जेट्टी , गणेश घाट रेतीबंदर येथे निर्माल्य संकलन केंद्रे उभारण्यात आली होती . प्रत्येक केंद्रावर साधारण २५ तरुण स्वयंसेवक यांची टीम नेमण्यात आली होती.  या श्री गणेश उत्सवात सुमारे ६० टन निर्माल्य व १८ टन प्लास्टिक तसेच ६ टन इतर घन कचरा गोळा करण्यात आले व आपले  जलसाठे प्रदूषणविरहित ठेवण्यास व स्वच्छ पर्यावरणाच्या दिशेने  एक पाऊल पुढे टाकण्यात आले .   या कार्यात साउथ इंडियन असोसिएशन , प्रगति, के.वि.पेंढारकर या तीन महाविद्यालयाचे NSS चे १५० स्वयंसेवक व निर्मल युथ फाउंडेशन चे ५० स्वयंसेवक सहभागी होते. 
     "निसर्ग खुलवू आनंदाने, खत बनवू निर्माल्याने" या ब्रीद वाक्यासोबत समाजिक भान जप्त संस्थेने एक निसर्ग संवर्धनाचा मूलमंत्र दिला.

3 Comments

Post a Comment

Previous Post Next Post