सोनारपाडा येथील शेतकऱ्यांचे कल्याण भूमिअभिलेख कार्यालयात ठिय्या  आंदोलन

 
( डोंबिवली प्रतिनिधी  : मुंबई डेटलाईन  24 शंकर जाधव  ) 



 सोनारपाडा येथील गोग्रास भिक्षा संस्थेच्या जमिनींवर १९३८ पूर्वीपासून ७१ स्थानिक भूमिपुत्रांचे संरक्षित कुळ असतांना धर्यदाय आयुक्तांना अंधारात ठेवून संबंधीत जमिन  बिल्डरला संस्थेमार्फत विकण्यात आली.या घटनेचा निषेध म्हणून शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीने जिल्हाधिकारी व तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन केले.काही महिन्यांपूर्वी सदर  प्रकरणामध्ये न्यायालयाकडून मनाई हुकूमही काढण्यात आला आहे.असे असतांना आज जी सोनारपाडा-दावडी  येथील याच जमिनीचे संयुक्त मोजणीसाठी उप अधिक्षक भूमिअभिलेख कल्याण यांनी आदेश दिलेच्या निषेधार्थ शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीकडून भूमिअभिलेख कार्यालयात उप अधिक्षक प्रमोद जरग यांच्या दालनात ठिय्या  आंदोलन करून निवेदन सादर केले.या वेळी उप अधिक्षकांनी ज्या जमिनींवर मुळ शेतकऱ्यांचा कब्जा आहे त्यांची रितसर मोजणी नकाशावर कब्जेवहिवाट दाखवून  नकाशात नोंद केली जाईल असे आदेश दिले. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष गणेश म्हात्रे,उपाध्यक्ष नवनित म्हात्रे, सरचिटणीस जितेंद्र ठाकूर,गुरूनाथ म्हात्रे,चिटणीस महेंद्र म्हात्रे, श्रीपत ठाकूर, दिलीप ठाकूर , भगवान ठाकूर,सोपान ठाकूर, शिवनाथ म्हात्रे, विनोद म्हात्रे, महादू केणे, मीराबाई म्हात्रे, शोभा म्हात्रे, ललिता म्हात्रे,शेतकरी बांधव,  महिलांनीही सहभाग घेतला होता.

Post a Comment

Previous Post Next Post