डोंबिवलीत वाहनांची तपासणी न करताच  मिळतेय पीयुसी ..,...
( डोंबिवली - श्हंकर जाधव )


वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला  आळा घालण्यासाठी किमान १० किमी अंतर चालणाऱ्या वाहनांची प्रदुषण नियंत्रण चाचणी (पी यु सी ) केली जाते. मात्र डोंबिवलीतील काही प्रदुषण नियंत्रण केंद्रावर  तपासणी न करताच वाहनचालकांना प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची तक्रार   काही नागरिकांनी केली आहे. असे प्रकार सर्रासपणे सुरु असल्याने डोंबिवलीचे प्रदुषण नियंत्रण करण्याचे ध्येय पूर्ण होत नसल्याचे दिसत आहे कारण वाहनांच्या धुरातून   कार्बन मोनेाक्साईड व हायड्रोकार्बन विषारी वायु सोडण्यात येत असतात यामुळे धुरामुळे होणारे प्रदुषण कमी होण्याऐवजी ते वाढत जात असल्याची तक्रार आहे.
             डोंबिवलीत विविध ठिकाणी वाहन प्रदुषण नियंत्रण केंद्रे  असून प्रदेशिक परिवहन कार्यालयामार्फत ही सेंटर्स दिली जातात मात्र या केंद्रावर  कोणतेही नियंत्रण नसल्याचे आढळून आले आहे नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदुषण नियंत्रण चांचणी करताना कोणतीही तपासणी न करताच पैसे घेऊन पावती दिली जाते याबददल वाहन चालकांनी वाद घातला असता पावती घ्यायची तर घ्या अशी तंबी देण्यात आल्याची नागरिकांची तक्रार  आहे.वाहनांकडून बाहेर पडणाऱ्या वायुमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रत्येक वाहनांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे मात्र या सेंटर्समधून केवळ पैसे घेऊन तपासणी न करताच पावती देण्यात येत असल्याची तक्रार  मोठया प्रमाणात होत आहे या प्रमाणपत्रासाठी दोन चाकी वाहनाकडून ४० रुपये,कार व आॅॅटो रिक्शा ८० व अवजड वाहनांसाठी १०० रुपये असे आकारले जातात अशी अनेक  सेंटर  केवळ पावती देऊन प्रमाणपत्र देत असल्याची वाहनचालक तक्रार  करत आहेत. यासंदर्भात उपप्रदेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांना  विचारले असता त्यानी तपासणी न करताच पावती देण्यात येत असेल तर अशा सेंटर्सची मान्यता रदद करण्यात येईल व परवाना निलंबित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post