गौरी पाड्यातील एकविरा ग्रुपचा स्तुत् उपक्रम तलावाच्या स्वच्छतेसाठी घेतला
पुढाकार
टिटवाळा:- मागील सोळा वर्षी पासुन तलाव संवर्धनासाठी पुढाकार
घेतलेल्या गौरीपाड्यातील एकविरा
ग्रुप यावर्षी गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर तलावांच्या
स्वच्छतेसाठी पुन्हा एकदा पुढे आली आहे. गणपती विर्सजन
कालावधीत तलावात हार फुल निर्मल्याचा कचरा जमा होणार नाही. याकडे लक्ष देत. गणपती
विर्सजानाची सेवा देतात. गौरीपाडा कल्याण ( पश्चिमेला) पुरातन कर्नाळा देवी तलाव असून या
नैसर्गिक जलस्त्रोतांचे सवंर्धन जतन व जलप्रदूषण मुक्त राहण्यासाठी एकवीरा
मित्र मंडळ गौरीपाडा , (एकवीरा ग्रुप गौरीपाडा) गणपती विसर्जन कालावधीमध्ये "शिस्तबद्ध
रित्या ,तलावाकाठी आलेल्या सार्वजनिक, घरगुती बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन
करतात.त्यांच्या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक केले जात आहे.
गणेश मूर्ती विसर्जनाच्या
ठिकाणी पिंपाच्या साहाय्याने एकवीरा मित्र
मंडळाने , दोन तराफे बनविले असून विसर्जनासाठी आलेल्या बाप्पाचे , क्रमावारीनुसार ,विसर्जन करण्यासाठी
तरफ्यावर नेले जातात. व त्यानंतर त्या मूर्तीचे तलावाच्या मध्यभागी नेऊन विर्सजन केले
जाते.विसर्जन करण्यासाठी आलेल्या भक्तांच्या ऐच्छिक देणगीतून एकवीरा मित्र मंडळ, नवरात्री उत्सव, व हनुमान जयंती
उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करतात.
या ग्रुपच्या माध्यमातून गणेश उत्सवा दरम्यान हार फुलाचे निर्मल्य
तलावाजवळ एक ट्रक मद्ये जमा करून ते खत निर्मितीसाठी वापरले जाते. तलावात निर्मल्य
व कचरा टाकू दिला जात नाही. गणपती विसर्जनासाठी होणाऱ्या गर्दीला शिस्तीचे धडे देत
धागंड धिंगाणा न होऊ देता आरती व पंरपरिक वादयाच्या तालावर तलावात गणपतीचे विसर्जन
होण्याकरीता एक दिवस एकवीरा मित्र मंडळाचे सदस्य कार्यरत असतात. गौरीपाडा कर्नाळा
देवी तलावामद्ये ५ दिवसाच्या १४८० गौरी गणपतीचे विसर्जन तर ७ दिवसाच्या ५८० गणपतीचे विसर्जन
करण्यात आले. या प्रसंगी एकवीरा मित्र मंडळ ( एकवीरा ग्रुप) विसर्जन सेवा अध्यक्ष
बाळाराम देसाईकर , गजानन म्हात्रे,
पिंटया म्हात्रे ,सुभाष म्हात्रे ,आदी सदस्य, कार्यरत राहत
विसर्जन सेवा करीत, आपला "तलाव संवर्धनचा वसा" अवरीतपणे पुढे चालवत आहेत.

Post a Comment