देशाच्या विकासात सहभागी होण्यासाठी पलावा वासियांचा पंतप्रधानांना ट्विटरद्वारे संदेश 

 डोंबिवली प्रतिनिधी : शंकर जाधव



डोंबिवलीजवळील पलावा कल्चरल व वेलफेयर असोशिएशनच्या वतीने
गणेशोत्सवाच्या निमित्ताने  ' @ वी द पलावीयन्स ' ह्या ट्विटर हँडलची निर्मिती केली आहे .या हँडलद्वारे  देशाच्या विकास योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी  पंतंप्रधान  नरेंद्र मोदी यांना  ट्विट  करण्यात आले आहे. पलावा रहिवाशांच्या वतीने यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे.


    पलावाच्या विस्तिर्ण अश्या निसर्गरम्य परिसरात उत्सव  दिमाखात सुरु आहे.याबाबत आयोजकांनी सांगितले.गणेश चतुर्थी निमित्त पलावा रहिवाशांनी ट्विटर हँडल निर्माण केले आहे.या ट्विटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांना गणपती महोत्सवानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.पंतप्रधान मोदी यांच्या कडे विकासाची दृष्टी असून  विकासात सहभागी होण्यासाठी संदेश पाठविण्यात आला आहे. .येत्या पंधरा वीस वर्षात जगातील अत्याधुनिक शहर म्हणून पलावाचा नावलौकिक होत आहे. भारतातील पहिले पर्यावरण स्नेही नागरिक म्हणून पंतप्रधानांच्या विकासांच्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी संदेश देण्यात आला आहे.येथील रहिवाशाना विविध पायाभूत सुविधा , रस्ते , वाहतूक कोंडी व इतर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्याबद्दल पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, सचिव कार्यालय यांच्याकडे संदेश पाठविले आहेत.असे वेलकंम असोसिएशन चे अध्यक्ष कुणाल कदम यांनी सांगितले.

सचिव संदिप होतकर, खजिनदार अभिनय खैरनार, सदस्य बालु भल्ला व इतर रहिवासी  गणपती उत्सवातील कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करत होते.यंदाच्या वर्षी पलावामधील रहिवाशांतील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी करमणूक, खेल व स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post