डोंबीवली :- ( शंकर जाधव )
सरकारने पेट्रोल, डिझेल, गँस ची दरवाढ कमी करावी अन्यथा रिक्षा चालकांना महागाई निर्दशांक प्रमाणे २०१२पासूनची भाडेवाढ द्यावी. या मागणीसाठी लालबावटा रिक्षा युनियनने २० सप्टेंबर पासून डोंबिवलीलीतील रिक्षांना काळे झेंडे लावून निषेध आंदोलन करण्यात आले. युनियनचे अध्यक्ष रिक्षा कोमास्कर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मात्र इतर रिक्षा युनियन सहभागी झाले नाहीत.
अनेक रिक्षाचालक सावकारी कर्जात अडकले जात आहेत.पेट्रोल, डिझेल, गँस ची दरवाढ होत असताना जीवनावश्यक वस्तुंची वाढ होत आहे.परंतू रिक्षांची भाडेवाढ सरकार करत नाही.अशा सर्व परिस्थितीत रिक्षाचालक आपल्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करित आहेत.महागाई निर्दशांक प्रमाणे प्रत्येक वर्षी १ मे रोजी रिक्षा प्रवास भाडेवाढ दिली पाहीजे असा हकिम समितीचा आणि राज्य सरकारचा निर्णय असताना देखिल रिक्षा भाडेवाढ दिली जात नाही.पूर्वी काँग्रेस सरकार आणि आता भाजप सरकार रिक्षा चालकांवर अतिशय घोर अन्याय करित आहे.त्यामुळे सरकारने पेट्रोल, डिझेल, गँस ची दरवाढ कमी करावी अन्यथा रिक्षा चालकांना महागाई निर्दशांक प्रमाणे २०१२पासूनची भाडेवाढ द्यावी. या मागणीसाठी लालबावटा रिक्षा युनियन तर्फे २० सप्टेंबर पासून डोंबीवलीतील रिक्षांना काले झेंडे बांधून निषेध आंदोलन करण्यात येत आहे.असे काळू कोमास्कर यांनी सांगितले.

Post a Comment