परतीच्या पावसाने नागरिकांची उड़वली धांदल... तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचा घटना 


टिटवाळा : अचानक झालेल्या परतीच्या पावसाने कल्याणग्रामीण भागांसह  टिटवाळा परिसरांत नागरिकांची धांदल उडवल्याचे पाह्यला मिळाले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले होते. टिटवाळा पश्चिमेकडील वासुंद्री रोडवर पथ दिव्यांचे  पोल  - खांब उखडून पडले होते.
   अचानक जोरदार वाऱ्यासह  वीजांचा कडकडाट होऊ लागला व परतीच्या पावसाला प्रारंभ  झाला.अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची घरी जाताना त्रेधातिरपीट उडाली. जोरदार वादळ वारा सुटल्याने या भागातील विद्युत पूरवठाही बराच वेळ खंडित करण्यात आला होता.  टिटवाळयासह नजीकच्या असलेल्या उशीद , फाळेगाव , दान बाव , नडगाव , बल्याणी , नांदप भागात अनेक ठिकाणी  झाडे उन्मळून पडली, अनेक घरांचे पत्रे उडाले होते. तर उभ्या शेतातील पीक आडवे झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post