सद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्यावतीने टिटवाळयात "भव्य रक्तदान शिबिर" संपन्न*
"तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा" हा संदेश देणाऱ्या स्वामी नरेंदाचार्य महाराज संस्थान समाजातील लोकांना एकत्र करून सामजिक बांधिलकी जपण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांतून सक्रियपणे काम करत असतात. आपल्या दैनंदिन जीवनात रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.यासाठी प्रतिवर्षी उपरोक्त संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. नरेंदाचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सुवर्णमहोत्सवी म्हणून सम्पूर्ण महाराष्ट्रात समाजिक उपक्रम राबविण्यात आले.
टिटवाळा येथेही मंगळवार दि.०२ ऑक्टोबर २०१८ रोजी उपरोक्त संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात महारक्तदान शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. सिद्धेश्वर हॉस्पिटल टिटवाळा स्टेशन जवळ सद्गुरु नरेंद्रचार्य महाराज भक्त सेवा मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या उपमहापौर सौ.उपेक्षाताई भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.या उपक्रमाला माजी नगरसेवक सुरेश भोईर, उद्योजक ज्ञानेश्वर भोईर, मनसे शाखाप्रमुख मिलिंद सावंत तसेच श्री संप्रदायाचे दक्षिण ठाणे जिल्हा सेवा समितीचे निरीक्षक दिलीप घाग,जिल्हाध्यक्ष अशोक पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिति लावली होती. या रक्तदान शिबिरात एकूण ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बळीराम कोंगेरे,पुंडलिक लट्ट्म,दिप चव्हाण,जनार्दन साळुंखे, विनय पालांडे, शाहिर सुनिल महाडिक आदींनी मोलाचे सहकार्य केले.


Post a Comment