महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राज्य निवडणुक आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने नविन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिर संपन्न
टिटवाळा : १३८ कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मांडा - टिटवाळा परिसरांतील नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राज्य निवडणुक आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने नविन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिर वार्ड क्र. ८ चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष रुपेश ( दादा ) भोईर यांनी आयोजित केले होते. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी नविन मतदार नोंदणी तसेच नोंदणी असलेल्या मतदारच्या दुरुस्तीबाबतचे अर्ज भरण्यात आले. आपल्या परिसराच्या जवळच नोंदणीची सोय उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी मनसेचे आणि शाखा अध्यक्ष रुपेश ( दादा ) भोईर यांचे आभार मानले. यावेळी "मतदान हा प्रत्येक सुजाण नागरिकाचा अधिकार असुन त्यापासून तो वंचित राहता कामा नये . परिवर्तन घडवण्यासाठी मतदान गरजेचे आहे. त्याचबरोबर तरुणांनी देखील आपल्या मतदानाच्या हक्काविषयी जागरु असायला हवे . मतदान हे आपले प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच आहे." अश्या असे मत यावेळी शाखा अध्यक्ष रुपेश भोईर यांनी व्यक्त केले.


Post a Comment