नगरसेवक संतोष तरे यांच्या निधीतून विकास कामाचा शुभारंभ.
टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या 'अ' प्रभागक्षेत्रातील प्रभाग क्र. १० टिटवाळा पूर्व गणेश मंदिर या प्रभागाचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नगरसेवक संतोष काशिनाथ तरे यांच्या नगरसेवक निधीतून वाघमारे आळी येथे पेव्हर ब्लॉक बसवून पायवाट (रस्ता) तयार करण्याच्या विकास कामाचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
येथील वाघमारे आळी परिसरात पायवाट नसल्याने शालेय विद्यार्थी व नागरिकांना चालणे मुश्किल झाले होते. पायवाट नसल्यामुळे गटारांचे सांडपाणी सर्वत्र पसरत असल्याने अनेक आजारांचा फैलाव होत होता साथीच्या रोगामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येचा आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीकोणातुन नगरसेवक संतोष तरे यांनी या विकास कामासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून नगरसेवक निधी मंजूर करून घेतला . याच विकास कामाचा शुभारंभ वाघमारे आळी येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे कल्याण-डोंबिवली जिल्हा सचिव मोरेश्वर तरे यांनी सांगितले की, गेली दोन वर्षापासून कल्याण महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थेची मंदी असल्यामुळे विकास कामासाठी नगरसेवक निधीची टंचाई भासत आहे. त्यामुळे नगरसेवकांना विकास कामासाठी दिरंगाई होत आहे. अनेक विकास कामे खोळंबली आहेत. महापालिका प्रशासनाकडे विकास कामासाठी नगरसेवकांना सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. नगरसेवक संतोष तरे यांनी प्रभागातील नागरिक विकासापासून वंचित राहू नये. यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून अखेर वाघमारे आळी परिसरात पेव्हर ब्लॉक बसवून पायवाट तयार करण्याच्या कामासाठी नगरसेवक निधी महापालिकेकडून मंजूर करून घेतला. वाघमारे आळी परिसरात येथे पेव्हर ब्लॉक लादी बसवून रस्ता व अंतर्गत पायवाट तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असुन यापुढेही अशीच विकास कामे नगरसेवक संतोष तरे या परिसरात करण्याचा प्रयत्न करतील असेही अण्णा तरे यांनी सांगितले.
या समयी राष्ट्रवादीचे कल्याण-डोंबिवली जिल्हा सचिव मोरेश्वर (आण्णा) विठ्ठल तरे, नगरसेवक संतोष (आप्पा) तरे, आर पी आयचे राहुल जाधव, दिलीप सोनवणे, मोहन तरे, कचरू वाघमारे, महेंद्र हाडवले, निलेश डोंगरे, मुस्तफा सय्यद, साईनाथ तरे, विजय वाघमारे, पंकज महाडिक,, कमलाकर गायकर ,संतोष वाघमारे, पप्पू वाघमारे अनिल भालेराव, अशोक डोंगरे, चंद्रकांत थोरात, चिंदू कचरे, आकाश गुंजाळ, सचिन घोडेस्वार, भालचंद्र वाघमारे, अरुण वाघमारे, आनंद वाघमारे, विठ्ठल वाघमारे, बाळ भगत, प्रसाद दलाल, भरत बेडसे, वैभव रोठे, राजेश एगडे, अमित तरे, तसेच महिला सुनंदा भांगरे यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वाघमारे आळी परिसरातील नागरिकांनी नगरसेवक संतोष तरे यांनी तातडीने समस्येची दखल घेउन काम सुरु केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले .

Post a Comment