पक्ष सोडून गेलेले नेते पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर...
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांचे जाहीर विधान...
डोंबिवली :- ( शंकर जाधव)
मोदी लाटेत आपले राजकीय भवितव्य उज्जल करण्यासाठी आणि आपली राजकीय कारकीर्द कायम टिकवण्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांनी पक्ष सोडून भाजपने प्रवेश केला होता.मात्र तिन्ही राज्यात भाजपची झालेली पीछेहाट झाल्याचे पाहून महाराष्ट्रात आता भाजपची सतत येईल का यावर सर्व पक्ष विचार करत आहे.ओसरत चाललेली लाट पाहून आता राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजप मध्ये गेलेले नेतेमंडळी पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे असे जाहीर विधान राष्ट्रवादि काँग्रेस सरचिटणीस संजीव नाईक यांनी कल्याण येथे केले.
कल्याण येथील चिकनघरमधील मंगेशी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पार पडले .यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संजीव नाईक बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी वक्तता सेलचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप सोलंकी, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ.वंडार पाटील , महिला कल्याण - डोंबिवली जिल्हा अध्यक्षा सारिका गायकवाड, माया कटारिया, पूजा पाटील, संगीता मोरे, उजवला भोसले,माजी नगरसेवक उमेश बोरगावकर,सुरेश जोशी, संदीप देसाई, यासह समीर भोईर, समीर गूधाटे, प्रसन्न अचलकर, ऊलकेश पवार, प्रवीण मुसळे, निरंजन भोसले, मधुकर शेळके, ज्ञानेश पवार, शैलेंद्र जोगदंड आदीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संजीव नाईक म्हणाले, कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत असलेल्या नगरसेवकांना व्हिजन नाही.आज परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून जे नेतेमंडळी भाजप मध्ये गेली होती ते पुन्हा पक्षात येणार आहेत.त्याबरोबर शिवसेना आणि भाजप मधील काही नाराज नेतेमंडळी आणि पदाधिकारी राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत.राष्ट्रवादी वक्तता सेलचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप सोलंकी म्हणाले, शिवसेना हा सत्तेत असूनसुद्धा विरोधी पक्षाची भूमिका निभावीत आहे असे चित्र त्या नेत्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतुन दिसून येत आहे.

आणि त्यामुळे पक्षाच्या अगदी पडत्या काळात जे कुणी पक्षाशी एक निष्ठ राहिले त्यांची मात्र काट मांडली जातेय.
ReplyDeletePost a Comment