बापू वैद्य आणि सहकारीच्यावतीने डोंबिवलीत पत्रकार दिन  
   डोंबिवली ( शंकर जाधव ) मराठी पत्रकारतेचे जनक कै.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी दर्पण साप्ताहिक ६ जानेवारीला सुरुकेले.त्याची आठवण म्हणून सर्वत्र हा दिवस `पत्रकार दिन`म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून डोंबिवलीत `पत्रकार बापू वैद्य आणि सहकारी`गेली करा वर्षे पत्रकार दिन साजरा करत असून हा १२ वा पत्रकार दिन ७ जानेवारीला सकाळी ११वा. श्रीगणेश मंदिराच्या वरद सभागृहात आयोजित केला आहे

   यावेळी प्रमुख वक्ते दै प्रहारचे वरिष्ठ उपसंपादक शामसुंदर सोन्नर व लोकमत समुहाचे संपादक दिनकर रायकर उपस्थित राहणार आहे.तसेच कडोंमपाचे आयुक्त गोविंद बोडकेमहापौर विनिता राणेआजी-माजी विरोधी पक्ष नेते,नगरसेवक-नगरसेविकापत्रकाविविध पक्षांंचे प्रतिनिधीशहरातील मान्यवर उपस्थिती असणार आहेत. गेल्या ११व्या पत्रकार दिनपासून पाच पत्रकार यांना सन्मानित केले जाते यावर्षी बाळशास्त्री जांभेकरशिक्षण महर्षी सुरेंद्र बाजपेयी,कै.श्रीकांत टोळ,लव अंकुशचे संपादक कै.चंद्रकांत गोरे,आणि कै.पत्रकार नरसिंह खानोलकर पुरस्कार पाच पत्रकारांना सन्मानित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती जेष्ठ पत्रकार बापू वैद्य यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post