रामदास आठवले यांच्या ह्ल्यामागील मुख्यसूत्रधाराला अटक करण्यासाठी रिपाईचे कल्याणात रस्ता रोको.... 
 डोंबिवली ( शंकर जाधव) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड ह्ल्यामागील मुख्य सूत्रधाराला लवकरात अटक करावी अशी मागणी करत रिपाई कल्याण जिल्ह्याच्यावतीने शुक्रवारी कल्याण येथील स्टेशनबाहेरील दीपक हॉटेल चौकात रस्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी तत्काळ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले.



  रिपाई कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली युवा आघाडी  अध्यक्ष जय जाधव, कल्याण शहर अध्यक्ष रामा कांबळे, कल्याण रिपाई रिक्षा युनियन अध्यक्ष विकास गायकवाड,सचिव मोहन पाठारे,सागर पगारे,गोविंदा गायकवाड,प्रभाकर पटेकर,अनिल गायकवाड, विशाल कदम,वी.के. गायकवाड,मुस्तफा शेख,विलास बोराडे,संजय सिंग, गौतम सोनावणे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या महिन्यात अंबरनाथ येथील एका कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर प्रवीण गोसावी या व्यक्तीने हल्ला केला होता.यावेळी हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली होती. मात्र या हल्ल्ल्यामागील मुख्यसूत्रधार हा मोकळा असल्याचे सांगत रिपाईच्या वतीने कल्याण येथे मोर्चा काढण्यात आला.मुख्यसूत्रधारापर्यत अद्याप पोलीस पोहीचू शकले नसल्याने रिपाईने रस्ता रोको आंदोलन केले. मात्र महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना तात्काळ अटक करून सोडून दिले.  
------------- ( सोबत फोटो जोडले आहेत ) --------------

Post a Comment

Previous Post Next Post