डोंबिवलीत घरफोडू मुद्देमाल लंपास
डोंबिवली : ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर परिसरात असलेल्या देवाशिष सोसायटीमध्ये राहणारे योगेश अन्जर्लेकर हे शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दाराला कुलूप लावून मुंबई येथे राहणाऱ्या आपल्या भावाकडे गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या बेडरूमचे ग्रील कापले आणि घरातील ५ लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने व हजार रूपयांची रोकड लंपास केली. रविवारी रात्री घरी परतल्यानंतर आंजर्लेकर यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ -------------
प्रॉपर्टीच्या वादातून मारहाण
डोंबिवली : ( शंकर जाधव ) भिवंडी तालुक्याच्या कोनगाव येथिल करेल हाऊस येथे राहणारे निसार करेल हे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील बोंबील चाळ येथून जात होते. इतक्यात अकबर खोटाल, खिजर खोटाल आणि जहद शेख या तिघांनी निसार यांना हटकले. तेथे या तिघांचे त्यांच्यासोबत प्रॉपर्टीवरून वाद झाला. या वादातून या तिघांनी निसार यांना ठोशा-बुक्क्यांनी बेदम मारहाण तर केलीच, शिवाय जीवे ठार मारण्याचीही निसार यांना धमकी दिली. अकबर याने निसार यांना रिव्हॉल्व्हर सारख्या दिसणाऱ्या वस्तूने त्यांच्या नाकावर फटका मारून दुखापत केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------
टायर चोरट्याला अटक
डोंबिवली : ( शंकर जाधव ) कल्याण पूर्वेकडील कचोरे (श्रीकृष्ण नगर) येथे राहणारे इबरान खान यांनी शनिवारी रात्री दहा वाजता आपली रिक्षा न्यू गोविंदवाडी येथील रस्त्यावर उभी केली होती. रियाज शेख या चोरट्याने रात्रीच्या सुमारास त्यांच्या रिक्षाचा पाठीमागील टायर चोरून नेला. सकाळी ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी रियाज शेख विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------------------
स्कुटीचे सामन चोरले
डोंबिवली : ( शंकर जाधव ) कल्याण पूर्वेकडील कर्पेवाडी (जिम्मी बाग) येथिल लोहार मिस्त्री चाळीत राहणारे प्रथमेश लोहार यांनी १२ ऑगस्ट सोमवारी रात्री आपली स्कुटी घराच्या बाहेरील ओट्यावर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांच्या स्कुटीचे हेडलाईट पॅनल, दोन्ही आरसे असे तीन हजार रुपये किमतीचे सामान चोरून नेले. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -------
दुचाकीच्या धडकेत महिला जखमी
डोंबिवली : ( शंकर जाधव ) डोंबिवली जवळचया कांचनगाव चामुंडा गार्डन येथे राहणाऱ्या नेहा साळुंखे या रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास 90 फुट रोड येथून पायी जात होत्या. इतक्यात भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली व दुचाकीस्वार पळून गेला. या अपघातात नेहा यांच्या डोके व पाठीला दुखापत झाली. या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात फरार दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment