डोंबिवली :- ( शंकर जाधव ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'ईडी' कडून नोटीस पाठवण्यात आली आहे. कोहिनूर प्रकरणातून ईडीने ही नोटीस पाठवली असून येत्या २२ ऑगस्ट रोजी राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे वृत्त आहे.राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना ईडीकडून नोटीस धाडण्यात आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे . या वृत्तानंतर मनसे नेते पदाधिकार्यांनी संताप व्यक्त करत जनतेच्या हितासाठी आणि सरकारविरोधात भूमिका घेतल्याने आकसापोटी ही नोटीस धाडण्यात आल्याच आरोप मनसेचे सचिव इरफान शेख यांनी केला आहें तसेच या नोटिसला उत्तर मनसे रस्त्यावर उतरून देईल असा इशारा शेख यांनी दिला आहे .सरकार या मनमानी विरोधात मनसेने 22 ऑगस्ट रोजी बंद पुकारला असून कल्याण शहरात ही बंद पुकारण्यात आल्याची माहिती मनसेचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर यांनी दिली.

Post a Comment