शीळ भोपोली येथे कातकरी समाजासाठी जातीच्या दाखल्यांसाठी कॅम्प चे आयोजन

 



विक्रमगड प्रतिनिधी / भारत पाटारा

    विक्रमगड तालुक्यातील शीळ भोपोली या ठिकाणी आज दिनांक 5/11/2020 रोजी येथील कातकरी समाजासाठी जातीच्या दाखल्यांसाठी तहसीलदार कार्यालय विक्रमगड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी च्या कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.

     यावेळी आदिम कातकरी संघटनेचे जिल्हा सचिव चंद्रकांत सवरा,विक्रमगड तालुक्याचे ग्राम साथी राजेंद्र वाघ,शासकीय कर्मचारी तसेच कातकरी बांधव आदी उपस्थित होते.तसेच 9 नोव्हेंबर रोजी तलवाडा आणि 10नोव्हेंबर रोजी आलोंडे या ठिकाणी या कँपचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post