टिटवाळा : टिटवाळ्यासह कल्याण ग्रामीण भागात संध्याकाळी अचानक आभाळा दाटून आले आणि सर्वत्र काळोख पसरला जोरदार सुटलेल्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने वर्दी दिली . अचानक आलेल्या पावसांच्या सरीने नागरिकांचा गोंधळ उडाल्याचे पाह्याला मिळाले. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील तापमानात अचानक वाढ झाली होती. त्यामुळे पावसाच्या सारी बरसणारा असा अंदाज वर्तवला जात असतानाच आज संध्याकाळी ५च्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वारा सुटला आणि अवकाळी पावसाने साधारण १५ मिनिटे दमदार हजेरी लावली . जोरदार सुटलेल्या वाऱ्याने टिटवाळा मांडा पश्चिम भागांतील चाळीतील काही घरांचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी जुनी झाडे तर गोवेली रोडवर जैन मार्बल या दुकानाजवळएक व त्यापासून दूर काही अंतरावर दुसरा असे दोन विद्युत पोल कोलमडून पडल्याची माहिती येथील महावितरणाचे अधिकारी महाजन यांनी दिली , अचानक कोसळलेल्या सरींनी नागरिकांची मात्र काहीशी तारांबळ उडाली होती.

Post a Comment