अामदार नरेंद्र पवार अाणि  उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या विद्यमाने पार पडला टिटवाळा परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा



मुंबई डेटलाईन 24 संपादक - अजय शेलार 

टिटवाळा : विद्यार्थ्यानी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत मिळवलेले यश हे त्यांच्या भावी आयुष्याची दिशा ठरवत असते . त्यासाठी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देत त्यांच्यातील गुणवत्ता अजून वाढीस लागून त्यांनी अधिकाधिक यश संपादन करावे या हेतूने आपल्या प्रभागात उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी  गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा  हा उपक्रम चालू केला. गेली सात वर्ष त्या हा उपक्रम सातत्याने राबवत आहेत.  हे वर्ष या उपक्रमाचे आठवे वर्ष होते. त्यांच्या या उपक्रमाची व्यापकता पाहुन गेल्या तीन वर्षांपासून आमदार नरेंद्र पवार यांनी देखील या उपक्रमात आपले योगदान देत हा सोहळा भव्य अश्या स्वरुपात साजरा करण्यात येत आहे . याही वर्षी अामदार नरेंद्र पवार अाणि उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या विद्यमाने शनिवार दि.२८ जुलै रोजी दुपारी ३ वा.मांडा-टिटवाळा परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अायोजित करण्यात अाला होता. या सोहळ्यात टिटवाळा परिसरांतील शालांत तसेच महाविद्यालयीन परिक्षेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकूण ८४  विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार नरेंद्र पवार , उपमहापौर  उपेक्षा भोईर, माजी संघटन मंत्री अण्णा वाणी,भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव परेश गुजरे,सिध्दीविनायक गणपती मंदिरचे विश्वस्त सुभाष जोशी, भाजपाचे सरचिटणीस,मोहने टिटवाळा मंडळ शक्तिवान  भोईऱ,कोळी महासंघ कल्याण शहरचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते केणेसर, विवेक पुराणिक  किरण रोठे, अमोल केदारे  यांसह  अनेक पदाधिकारी तसेच विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .
Attachments area
https://youtu.be/8q4ih3qjCl8  

(MUMBAI DATELINE 24) *मुंबई डेटलाईन 24*  *आपल्या परीसरातल्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा आणि यूट्यूबवर  ' मुंबई डेटलाईन 24 (MUMBAI DATELINE 24) हे चॅनेल सब्सक्राईब आणि लाईक करा.तसेच बाजुला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा  तुमच्या प्रतिक्रिया आम्हांला कमेंटबॉक्समधे लिहा . आपल्या परिसरातले  उपक्रम,समस्या  आम्हाला mumbaidateline24@gmail वर  किंवा (मुंबई डेटलाईन 24 संपादक - अजय शेलार 9819881172) या क्रमांकावर पाठवा*

Post a Comment

Previous Post Next Post