डोंबिवली पश्चिमेत रिक्षाचालकांची स्वयंंघोषित दरवाढ .....
रिक्षाचालकांची लुट सुरूच...
प्रवाशी व रिक्षाचालकांमध्ये वाद सुरु...
डोंबिवली : ( प्रतिनीधी- शंकर जाधव )
उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक विभागाच्या दुर्लक्षि पनाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मुजोर रिक्षाचालकांनी स्वयंंघोषित भाडेवाढ केल्याने प्रवाशी व रिक्षाचालकांंमध्ये वाद सुरु झाला आहे.लवकर यावर तोडगा न निघाल्यास प्रवाशी व रिक्षाचालकांमध्ये वादाचे पर्यावसन हाणामारीत होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
रिक्षा चालक – मालक संघाने पश्चिमेकडील स्टेशनसमोर लावलेला दरवाढीचा फलक काढून टाकावे अशी ओरड सुरु झाली आहे.
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मुजोरी वाढली असून याला रिक्षा युनियन खतपाणी घालत आहेत. रिक्षाचालकांनी कोणतीही परवानगी न घेता केलेल्या भाडेवाढीसंदर्भात रिक्षा युनियनने शांततेची भूमिका निभावली आहे. तर दुसरीकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांनीहि यावर कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी पश्चिमेकडील स्टेशनसमोरील तृप्ती हॉटेलसमोर एका रिक्षा थांब्यावर रिक्षाचालकांनी २ रुपये भाडेवाढ केल्याचे फलक लावले होते. त्यावेळी रिक्षा युनियन, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक विभागाने शांत रहाणे पसंत केले. आता पुन्हा एका रिक्षाथांब्यावर २ रुपये भाडेवाढ केल्याचे फलक लावले आहे. मात्र प्रवाश्यांना ही भाडेवाढ मान्य नसल्याने रिक्षाचालक आणि प्रवाश्यांमध्ये वाद सुरु होत आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी ससाणे यांना संपर्क केला असता अश्या प्रकारची कोणतीही भाडेवाढ झाली नसून सदर फलक महानगरपालिकेला काढण्यास सांगण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, भाडेवाढ संदर्भात उपप्रादेशिक परिवहन विभागाने लवकरात योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
mumbaidateline24.blogspot.com
mumbaidateline24.blogspot.com
Post a Comment