*हेलपिंग हॅन्ड फाऊंडेशन, ठाणे यांचा उपक्रम*
शेंडेगाव ला "शैक्षणिक साहित्य" वाटप त्या सोबत पर्यावरण स्नेही "वृक्षारोपण"

*शेंडेगाव, ठाणे*: हेलपिंग हॅन्ड फाऊंडेशन , ठाणे तर्फे जि.प. प्राथमिक शाळा, शेंडेगाव, बिरवाडी, ता. शहापूर, जि. ठाणे या शाळेला स्टेशनरी देऊन गरीब विद्यार्थ्यांसाठी हे  नवीन वर्ष आनंदाने चालू व्हावं ह्या उद्देशाने  मदत केली. इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना व्यायसाय व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्याच बरोबर पर्यावणरणाचा विचार करता वृक्ष लागवड आजच्या काळात किती महत्वाची आहे याची जाण ठेवून शेंडेगाव येथे हेलपिंग हॅन्ड फाऊंडेशन ने वृक्षरोपणाचा उपक्रमही राबवला. यावेळी हेलपिंग हॅन्ड फाऊंडेशन चे सर्व प्रतिनिधी रमाकांत अग्रवाल, वरूण अग्रवाल, स्वप्निल मंडलिक, आनंद जैसवार , राहून सिंग, नरेश शेलार, प्रभाकर पाटील, भूषण देशमुख,  स्वप्निल सानफ, दिपक भेरे,बबलू ठाकूर, प्रसाद घोडविंदे, तरुण हजरती, जगन्नाथ दळवी, रमेश चोरगे, हरीश भेरे, राम खाडे, दिपक तिवारी,सुनिल बोरकर, शिक्षक वर्ग, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक वरकुटे यांनी मांडले आणि हेलपिंग हॅन्ड फाऊंडेशन चे प्रतिनिधी निलेश खाडे यांनी हेलपिंग हॅन्ड फाऊंडेशन च्या कार्याची ओळख शाळेला व ग्रामस्थांना यावेळी करून दिली त्या नंतर फाऊंडेशन तर्फे अन्नदान  देखील करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post