रुग्णाने रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून घेतली उडी
डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात धक्कादायक घटना 

उपचारादरम्यान रुग्णाचे नातेवाईक त्याच्या आजाराला कंटाळून गेले होते  निघून असे हॉस्पिटलचे म्हणणे ..

हॉस्पिटलने आपली जबाबदारी झटकली...
*मृत रुग्ण गोकुळ थोरात*

पोलिसांनी सुरु केला तपास...

डोंबिवली :डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल संध्याकाळी डोंबिवली पूव्रेतील कोपर परिसरात राहणारे गोकूळ थोरात या व्यक्तिलाडायलेसिससाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी सहा वाजता गोकूळ थोरात यांनी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर उडी मारुन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास मानपाडा पोलिस करीत आहे.

 मात्र रुग्णालयाने खुलासा केला आहे. रुग्णाचे नातेवाईकाना त्यांच्यासोबत थांबण्यास सांगितले होते. त्यांच्या आजाराला कंटाळून कोणी तिथे थांबले नाही. रुग्णालयाने गोकूळ यांच्या आत्महत्येसाठी नातेवाईकांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न करीत आपली जबाबदारी झटकली आहे.रुग्णालयाच्या खिडक्याना ग्रील नाही. स्लाईडींग काचा आहेत. जेव्हा गोकूळ यांनी उडी घेतलीत्यावेळी हॉस्पिटल कर्मचारी त्याठिकाणी होते कि नाही? त्यांची काही जबाबदारी नाही का? या सगळ्य़ा घटनेमुळ रुग्णालय वादाच्याभोवऱ्यात सापडले आहे. याप्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी बोलण्यास नकार दिला आहे.पोलिसांनी तपास सुरु केला आहे. रुग्णालयाच्या प्रमुख अधिकारी शीतल चौगूले यांनी रुग्णालय या घटनेच जबाबदार नाही असे सांगून हात वरती केले आहेत.

 (मुंबई डेटलाईन 24 डोंबिवली प्रतिनिधी : शंकर जाधव) 

Post a Comment

Previous Post Next Post