२७ गावातील दस्त नोंदणी तातडीने सुरू करा..
संघर्ष समितीची चंद्रकांत पाटीलांकडे मागणी
(डोंबिवली प्रतिनिधी- शंकर जाधव )कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावामध्ये गेली १ महिने दस्त नोंदणी बंद असून हा प्रश्न भूमीपुत्राच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तेव्हा ही बंदी तातडीने मागे घ्यावी अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना २७ गावातील दस्त नोंदणी बंद असल्याने भूमिपुत्रांना त्रास होत असून हा प्रश्न आमच्यासाठी जिव्हाळ्याचा असल्याचे निदर्शनास आणले व दस्त नोंदणी मागे घ्यावी अशी मागणी केली. या विषयावर आपण सकारात्मक असल्याचे पाटील यांनी सांगितले यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस ,पालकमंत्री एकनाथ शिंदे ,राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन २७ गावाची नगरपालिका स्थापन करावी ,कल्याण ग्रोथ सेंटर ,नेवाळी भूमीपुत्रावरील आंदोलनाचे खटले मागे घ्यावे ,कल्याण -शीळ रोडवर होणारी वाहतूक कोंडी याबाबत चर्चा करून हे प्रश्न सोडवण्याची मागणी केली अशी माहिती सरचिटणीस चंद्रकात पाटील यांनी दिली गुलाब वझे ,बळीराम तरे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
Post a Comment