एसीपी आले आणि मोर्चेकरी फेरीवाले पांगले.....
(मुंबई डेटलाईन 24डोंबिवली :प्रतिनिधी -शंकर जाधव)
हातावर पोट असलेल्या फेरीवाल्यांना बसल्याण्यास जागा दिली नसून दुसरीकडे स्टेशनबाहेरील परिसरात पालिकेच्या कारवाईची टांगती तलवार असल्याने अखेर फेरीवाल्यांच्या सहनशीलतेच अंत झाला. मंगळवारी सायंकाळी संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला.आमचा माल पकडता मग पोलिसांना बोलावून आता आम्हालाही अटक करा अशी ओरड करणारे फेरीवाले सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर आले असता फेरीवाल्यांना पांगले.तर पालिकेने काही फेरीवाल्यांचा नाशवंत परत दिला.त्यानंतर कष्टकरी हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांच्या विनंतीवरून पालिकेने नाशवंत माल फेरीवाल्यांना परत केला.
Post a Comment