कल्याण मुरबाड राष्ट्रीय
महामार्गावर ४११८ खडड्यांचे साम्राज्य
नागरिक , प्रवासी व वाहन चालक हैराण
( मुंबई डेटलाईन 24 : मुरबाड प्रतिनिधी - लक्ष्मण पवार) :
मुरबाड
कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वरपे शहाड फाटक दरम्यान जवळपास
छोटे-मोठे ४११८ खड्डे पडून या
खड्ड्यांनी या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. तसेच अगदी दोन दिवसावर
ठेपलेल्या गणपती बाप्पाचे आगमन याच रस्त्याने होणार असल्याने संतप्त गणेश भक्त, प्रवासी, वाहन चालक ,आपला जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. त्यामुळे यापूर्वी
या रस्त्याने जाताना कल्याण प्रवासी तसेच मुरबड प्रवासी यांना ३० किलोमीटरचे अंतर
पार पाडण्यासाठी ३० ते ३५ मिनिटे लागायची परंतु आता हा प्रवास दोन ते अडीच तासावर
जाऊन ठेपला आहे तसेच शहाड फाटक ते म्हारळ दरम्यान यंत्रणेने काम चालू केले आहे या
यंत्रणेचे काम अगदी मंद गतीने चालू आहे त्यामुळे वरप ते शहाड दरम्यान खड्ड्यांचे
साम्राज्य पसरलेले पहायला मिळत आहे. त्यामुळे गणरायाचे आगमन याच खड्ड्यांमधून होणार असल्याने
गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
वरप ते म्हारळ दरम्यान खड्डे भरण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी
एमएमआरडी या अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्र दिले होते तसेच जुलै महिन्यात सामाजिक
कार्यकर्ते हिंदुराव यांनी पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन केले होते. या
आंदोलनाची एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी दखल घेतली खरी पण ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या त्या ठिकाणी
फक्त खडी व ग्रिट टाकून प्रमाणात खड्डे भरले होते त्या ठिकाणी पुन्हा मुरबाड
कल्याण हा रस्ता मोठ्या प्रमाणात चालत असल्याने वाहनांची वर्दळ वाढली असल्याने जसेच्या
तसे खड्डे पहावयास मिळत आहेत. त्यामुळे हे खड्डे पडून वरप व महारळ रस्त्याची
अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवासी आपला जीव धोक्यात घालून
प्रवास करत आहेत तसेच माळशेज घाट मार्गे कल्याण मुंबई येथील मार्केट मध्ये
भाजीपाला दूध वाहतूक करणारे शेकडो वाहने या रस्त्यातून जात असतात काही वेळा
ट्रॅफिक जाम असल्यामुळे आपला माल उशिरा पोहोचतो त्यासाठी वाहनचालक आपला जीव मुठीत
धरून गाडी चालवत आहेत.
१ जुलै २०१८ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वरपे येथे आले असताना
हाच रस्ता एका दिवसात चांगला करण्यात आला होता. परंतु पावसाळ्यात या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. याकडे संबंधित
खात्याचे अधिकारी लक्ष देत नाहीत अश्या प्रतिक्रिया शाळेचे विद्यार्थी पालक व्यापारी
प्रवासी वाहन चालक यांनी व्यक्त केल्या आहेत. अगदी दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव
लक्षात घेता हे खड्डे बुजवले जातील असे चित्र वाटत होते परंतु प्रशासनाचे सुस्त अधिकारी यांनी याकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे.
तसेच ज्या यंत्रणेने जानेवारी- फेब्रुवारी २०१८ या महिन्यांमध्ये हे काम करणे
अपेक्षित होते . मात्र तसे न झाल्याने या रस्त्यावर जे ४११८ खड्डे पडले आहेत
त्यांना संबंधित यंत्रणा व प्रशासन जबाबदार
असल्याची प्रतिक्रिया सुपरस्टार ऑल सोशल फाउंडेशन या पत्रकार संघटनेने केली आहे.
Post a Comment