मुंबईमधील बालसुधारगृहात गणेशोत्सवानिमित्त टिटवाळयातील गंधर्व कलाधाराने सादर केला कलाविष्कार


(मुंबई डेटलाईन 24 टीम )





 टिटवाळा येथील कलाकारांनी सामाजिक बांधिलकी जपत डोंगरी, सॅण्डसरोड,डोंगरी,मुंबई बालगृह/सुधार गृह, येथे गाण्याच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. समाजापासून दूर  असणाऱ्या ४०० मुला , मुलींनी व या मुलांची काळजी घेणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी गाण्याचा मनसोक्त आनंद घेतला. विशेष करून तेथील मुला व मुलींनी स्वतःहुन विविध  कलाविष्कार दाखवून सर्वांची वाहवा मिळवली.

सदर गाण्याच्या कार्यक्रमात उज्वल धनगर यांच्या निवेदनाने मुलांमध्ये उत्साह निर्माण केला.तर गायक कलाकार शरदजी इंगळे, किरण कांबळे, आरोही कदम,नॅन्सी यांनी मुलांना व  कर्मचारी यांना गाण्याच्या ठेकावर नाचायला भाग पाडले.गाण्याचा कार्यक्रम संपल्यावर त्या मुलांच्या चेहऱ्यावर असणारे आनंदाचे भाव व पुन्हा परत गाण्याचा कार्यक्रम देण्यासाठी घातलेली गळ विसरण्यासारखी नव्हती अश्या भावना यावेळी गंधर्व कालाधाराचे प्रमोद नांदगावकर यांसह  कलाकारांनी व्यक्त केल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाल सुधार केंद्राचे कुलकर्णी सर, चंदर व गंधर्व चे अतुल शिंपी,ओंकार उबाळे यांनी अथक परिश्रम घेतले.


1 Comments

  1. Khup Sundar ase kam kele ahe pramod ji and team ......very much proud for such social work.
    Ase kamm karat raha.jai hind.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post