टिटवाळयातील रत्नाकर पाटील यांच्या घरी अवतरले तिरुपती बालाजी, महालक्ष्मी मंदिर आणि गोकुळ धाम
नयनरम्य घरगुती गणपतीची आरास भाविकांची रीघ
टिटवाळा:- ( अजय शेलार )- १९ वर्षांची परंपरा जपत टिटवाळयातील रत्नाकर पाटील यांनी याही वर्षी घरगुती गणपतीच्या सजावटीत नयनरम्य डोळ्याचे पारणे फेडणारी अशी आरास साकारली आहे. रत्नाकर पाटील यांचे धर्मा पाटील यांचा आपल्या घरातील गणपतीच्या सजावटीत स्वत: वेगवेगळे देखावे
साकारण्याचा त्यांच्यातला कलात्मक वारसा जोपासत त्यांनी आपली पिढीजात परंपरा जपली आहे.
यावर्षी आपल्या घरातील गणपतीच्या सजावटीत तिरुपती बालाजी, महालक्ष्मी मंदिर आणि गोकुळ धाम या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली असून भव्यदिव्य असलेली ही आरास पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळत आहे. टिटवाळयातील रहिवासी रत्नाकर पाटिल यांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी आणि भाविकांसाठी आपल्या घरात तिरुपती बालाजी, महालक्ष्मी मंदिर आणि गोकुळ धाम या मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभारत अतिशय मनमोहक असा देखावा तयार केला आहे. सुमारे 5 लाख रुपये या सजावटीवरती खर्च करण्यात आला असून तीन मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली आहे. गेले १९ वर्ष पाटील हे आपल्या घरी देशातील आणि राज्यातील विविध मंदिरांच्या प्रतिकृती उभारत आहे. मागच्या वर्षी दत्ताचे ३ अवतार गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ आणि साई बाबा यांच्या मंदिराच्या प्रतिकृती उभारल्या होत्या.१० दिवस असलेल्या या गणपतीची आरास पाहण्यासाठी डोंबिवली ते कसारा, मुरबाड, भिवंडी व टिटवाळा शहरासह कल्याण ग्रामीण या सर्व पट्ट्यातुन भाविक येत असतात . सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत देखावा पाहण्यासाठी भाविकांची रिघ लागलेली असते.

याबाबत पाटील यांनी सांगितले की अनेक भाविकांना देशातील मंदिरे बघण्याची तेथे जाऊन दर्शन घेण्याची इच्छा असते मात्र सगळ्यांच ते शक्य होत नाही. म्हणूनच अशा भाविकांच्या श्रद्धेचा आदर करत दर्शनाचा लाभ त्यांना मिळावा यासाठी आम्ही या प्रतिकृती तयार केल्या आहेत.
_________________________________________________________________________________________________जाहिरात_______________________________________

Post a Comment