उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या प्रयत्नांतून मांडा- टिटवाळ्यासाठी अग्निशामन केंद्राला ८३ लक्ष रुपयांच्या निधिसहित मिळाली मंजुरी.
————————————————————————————————————————
कल्याण(१०/०९/२०१८)
उपमहापौर उपेक्षा भोईर
अाज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची महासभा सुरु असताना विषय क्र.७ च्या अनुषंगाने उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी मांडा-टिटवाळा परिसरातील विविध समस्यांविषयी प्रश्न उपस्थित केले.मांडा-टिटवाळा परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत अाहे.बिल्डिंगचे साम्राज्य उभे राहत अाहे.परंतु एखादी दुर्दैवी घटना घडली तर अाजच्या परिस्थितीत या परिसरात एकही अग्निशामन केंद्र नाही.महापालिकेने या प्रश्नावर गांभिर्याने विचार करावा अाणि तात्काळ या परिसरासाठी अग्निशामन केंद्र मंजुर करावे अशी सुचना सभागृहाला केली व हा विषय अाजच्या सभागृहात मंजुर करण्यात अाला अाहे.या केंद्राच्या बांधकामासाठी महापालिकेने ८३ लक्ष रुपये एवढ्या अार्थिक निधिची तरतुद सुध्दा अाज केली अाहे.लवकरात लवकर हे अग्निशामन केंद्र उभारले जाणार अाहे अशी माहिती उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी मुंबई डेटलाईन24 शी बोलताना दिली.
Post a Comment