मुख्यमंत्री शब्द पाळत नाहीत ....

    संघर्ष समितीची जाहीर टीका 



(डोंबिवली : प्रतिनिधी – शंकर जाधव ) डोंबिवली जवळील मानपाडेश्वर मंदिरात संघर्ष समितीच्या सभेत समितीच्या कार्यकारिणीतील नवनियुक्त सुमारे १५० पदाधिकाऱ्यांना नियुक्ति पत्रे देण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.मुख्यमंत्री दिलेला शब्द पूर्ण करत नाही अशी टीका समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांनी केला. 


या सभेत  अध्यक्ष गंगाराम शेलारसरचिटणीस गुलाब वझे, पदाधिकारी चंद्रकांत पाटिल, वंडार पाटील अर्जुनबुवा चौधरी, वसंत पाटील, बलीराम तरे, इत्यादी मान्यवरांनी उपस्थित सदस्यांना आणि गावकऱ्यांना  मार्गदर्शन केले. या सभेत समितीच्या कार्यकारिणीतील नवनियुक्त सुमारे १५० पदाधिकाऱ्यांना नियुक्ति पत्रे देण्यात आली.यावेळी अध्यक्ष गंगाराम शेलार, गुलाब वझे, अर्जुनबुवा चौधरी, बळीराम तरे, वंडार पाटील, चंद्रकात पाटील आदी मान्यवरांनी भाषणे केली.

     गेली अनेक महिने २७ गावतील दस्त नोंदणी बंद असल्याने याचा त्रास बांधकाम व्यवसायिकांना असल्याचे सांगत खूप आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे २७ गावतील दस्त नोदणी पुन्हा सुरु करावी अशी मागणी समितीने केली आहे.गंगारामशेठ पाटील, पांडुशेठ म्हात्रे, अँड शिवराम गायकर, रमेश ठाकूर, विजय भावे, विठ्ठल वायले, कैलास जोशी,दत्ता वझे  इत्यादी नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी आपले विचार मांडले.यावेळी समितीचे सरचिटणीस चंद्रकात पाटील यांनी सूत्रसंचालन केले.


Post a Comment

Previous Post Next Post