टिटवाळा : - गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या टिटवाळा येथील घर आंगण ते नारायण नगरच परिसरातील रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले असून नगरसेवक संतोष काशीनाथ तरे यांच्या प्रयत्नांतून आणि आमदार नरेन्द्र पवार यांच्या आमदार निधीतून टिटवाळयातील विकास कामांसाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. आमदार पवार यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.
येथील नारायण नगर ते घर- आंगण पर्यंतच्या रस्त्यांची अवस्था ही अतिशय दयनीय झाली होती. त्यामुळे येथील नागरिकांना आणि वाहनचालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत होती.नगरसेवक तरे यांनी आमदार नरेंद्र याबाबत आमदारांना पत्रव्यवहार करून या रस्त्यांच्या कामांसाठी २५ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला असून पहिल्या टप्प्यात नारायण नगर ते रेश्माई विद्यालय पर्यंतचा रस्ता करण्यात येणार आहे.
सदरचा रस्त्याचे डांबरीकरण करून तो नागरिकांनावापरासाठी लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
त्याचबरोबर टिटवाळयातील विविध विकासकामांसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी देण्यार असल्याचे या कार्यक्रमाप्रसंगी आमदारांनी सांगितले. यामुळे टिटवाळयातील विविध प्रलंबित कामे पूर्ण होणार असल्याचे नगरसेवक संतोष तरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमप्रसंगी उपमहापौर उपेक्षां भोईर ,राष्ट्रवादी पक्षाचे सचिव मोरेश्वर ( आण्णा) तरे, सय्यद चाचा,टिटवाळा मोहने मंडळाचे सरचिटणीस शक्तिवान भोईर, बेडसे, मोहन तरे, दीपेश तरे, अमित तरे, महेश एगडे, तसेच भाजपचे युवा अध्यक्ष अमोल केदार, वैभव पुजारी, बजरंग अग्रवाल, भगत, नारायण नगरचे अध्यक्ष व पदाधिकारी,कार्यकर्ते यांसह अनेक नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित लावली होती.
Post a Comment