पत्रकार शंकर कराडे यांच्या 'विकासाचा
महामेरू' या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.
मुरबाड : मुंबई
डेटलाईन 24 प्रतिनिधी-
लक्ष्मण पवार : दिनांक मुरबाड तालुक्याचे आमदार किसन
कथोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘समता सामाजिक फाउंडेशन’ महाराष्ट्र राज्य
या संस्थेने ‘विकासाचा महामेरू’ या विशेषांकाचे प्रकाशन किसन कथोरे यांच्या हस्ते
करण्यात आले. या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाला तालुक्यातील हजारो
नागरिकांनी हजेरी लावली होती. विकासाचे वादळ अशी ओळख असलेले आमदार किसन कथोरे
यांनी आरोग्यविषयक कार्यक्रम, रस्ते, शिक्षण,माहेरवाशिणी कन्यादान योजना
सामाजिक उपक्रम अशा अनेक योजना तालुक्यामध्ये राबवल्या आहेत. या
सर्व सामाजिक उपक्रमांचा लेखाजोखा ‘समता सामाजिक फाउंडेशन’ महाराष्ट्र राज्य यांनी
विकासाचा महामेरू या विशेषांकात प्रकाशित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपा तालुका उपाध्यक्ष भास्कर
शेठ वडवले, नगरसेवक रवींद्र देसले, दैनिक
पुढारीचे पत्रकार बाळासाहेब भालेराव, संतोष गायकर, नरेश मोरे, पत्रकार लक्ष्मण
पवार यांसह मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment