"देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेची  दिशाभूल करण्यासाठी देशभक्तीचे भाषणे करत असतात"- कॉंग्रेस निरीक्षक बी. एस. संदीप



डोंबिवली :- दि. २९ ( प्रतिनिधी- शंकर जाधव  ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशप्रेम दिखाव्यापुरते असून जनतेची  दिशाभूल करण्यासाठी देशभक्तीचे भाषणे करत असतात. लोकसभेत राहुल गांधीनी १० प्रश्न विचारले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर न देता वेगळ्या विषयावर बोलले. मोदी आता विकासावर बोलत नाही.फक्त `मनकी बात` बोलत आहेत अशी जाहीर टीका कॉंग्रेस निरीक्षक बी. एस. संदीप यांनी डोंबिवलीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला. `प्रोजेक्ट शक्ती`अॅपची माहिती घरोघरी पोहोचवा. अॅपमुळे कॉंग्रेसच्या खऱ्या कार्यकर्त्याची माहिती मिळणार आहे. या अॅपमुळे राहुल गांधीचे उत्तर एसएमेएसतून कार्यकर्त्यांना मिळणार आहे.असेही यावेळी सांगण्यात आले.  
   कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधीच्या `प्रोजेक्ट शक्ती`अॅपची ची माहिती देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत कॉंग्रेस पदाधिकारी जनरल सेक्रेटरी राजन भोसले, जनरल सेक्रेटरी राजेश शर्मामहाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव प्रकाश मुथा, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर, ब्लॉक अध्यक्ष गंगाराम शेलार,एकनाथ म्हात्रे, माजी जिल्हाध्यक्ष मुन्ना पंडित, प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे, नवीन सिंग,कल्याण शहर जिल्हा महिला अध्यक्षा कांचन कुलकर्णी, कार्याध्यक्षा वर्षा गुजर, महाराष्ट्र पर्यावरण सचिव वर्षा शिखरेगटनेते नंदू म्हात्रे, नगरसेविका दर्शना शेलार, हर्षदा भोईर,माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे, अमित म्हात्रेमाजी नगरसेवक रवी पाटील, सदाशिव शेलार, हर्षद पुरोहित  आदि मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जनरल सेक्रेटरी राजेश शर्मालोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येत्या ६ महिन्यात होणार असल्याने कार्यकर्त्यांनी जागे व्हा, पक्षाला उभारी देण्यासाठी प्रचाराला सुरुवात करा असा सल्ला दिला.पुढे कॉंग्रेस निरीक्षक बी. एस. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, मोदींची देशभक्ती फक्त बोलण्यापुरती आहे. मोदींकडे बोलण्यासारखे आता काही राहिले नाही. कॉंग्रेस वर आरोप आणि टीका करण्यात त्यांच्या भाषणाचा वेळ जातो. निवडणुकांपूर्वीहि कॉंग्रेसवर टीका करत होते आणि आता साडेचार वर्षांनीहि कॉंग्रेसवरच बोलत आहेत. त्याच्याकडे बोलण्यासारखे आता काही राहिले नाही.भाजपचे नितीन गडकरी यांनी डोंबिवली घाणेरडी अशी टीका केली होती. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत अनेक वर्षे शिवसेना - भाजपची सत्ता असताना याच पालिकेतील डोंबिवली शहराला घाणेरडे याच पक्षातील नेते म्हणत असतील हे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेला सांगितले  पाहिजे.`प्रोजेक्ट शक्ती`अॅपमुळे कॉंग्रेसच्या खऱ्या कार्यकर्त्याची माहिती मिळणार आहे. या अॅप राहुल गांधीचे उत्तर एसएमेएसतून कार्यकर्त्यांना मिळणार आहे.कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अखिलेश भोईर यांनी सांभाळली.


 * ढिसाळ नियोजनामुळे कॉंग्रेस निरीक्षक वैतागले....

 डोंबिवलीत पार पडलेल्या पदाधिकाऱ्याच्या बैठकीत नियोजन व्यवस्थित नसल्याने काही पदाधिकारी आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठावर आले असता त्यांना मागचे पाठे वाचू नका, भविष्यात काम करण्याबाबत बोला असे कॉंग्रेस निरीक्षक बी. एस. संदीप यांना सांगावे लागले. कल्याण येथील पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर आपले मत मांडण्यासाठी संधी मिळावी म्हणून कल्याण मधील पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्याचे दिसले. ढिसाळ नियोजनाची कार्यकर्त्यामध्ये चर्चा सुरु झाली होती.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
* आमच्यात वाद नाही ....
 पदाधिकारी प्रकाश मुथा आणि सचिन पोटे यांच्यातील धुसपूस सर्वश्रुत आहे. मात्र या बैठकीत या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आमच्यात वाद नाही असे जाहीर केल्याने कार्यकर्त्याच्या भुवयां उंचावल्या होत्या.


Post a Comment

Previous Post Next Post