भात शेतीवर करपा रोग... भात शेती धोक्यात...
जव्हार: तालुक्यात गेल्या काही दिवसापासुन पावसाने हुलकावणी दिल्याने पाऊसा अभावी भात शेती संकटात आले असुन जव्हार तालुक्यात एक दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडल्याने हळव्या भातासह गरव्या भात पिकाला दीलासा मिळाला परंतु असे असले तरी करपा रोगाचा फटका पिकांवर बसला आहे.ऐन भात पिक तयार होण्यासाठी प्रक्रिया सुरु असताना आवश्यक पाऊस शेतीला मिळाला नसल्याने भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.त्याच बरोबर करपलेली पिक , जमिनीला पडलेल्या भेगा जणु काही दुष्काळच चिञ दर्शवित आहे.
जव्हार तालुक्यात नागली,भात,वरई,कुळीद,खुरासणी, उडीद,तुर अशी अनेक पिके घेतली जातात परंतु भात हे पिक प्रामुख्याने घेतले जाते.सुरवातीला समानधारक पाऊस झाल्याने सुमारे95 टक्के किमाची लागवड करण्यात आली परंतु येथील वरच्या पाण्यावर अवलंबुन असलेली भात शेती सध्या धोक्यात आली आहे.पांरपारीक शेती पुढे करायची की नाही असा प्रश्न आता या भागातील शेतकऱ्यासमोर येऊन ठेपला आहे.
Post a Comment