पद्मशाली समाजाचा ३००० बांधवांचा मूक मोर्चा धडकला भिवंडी प्रांत कार्यालयावर


भिवंडी : (मुंबई डेटलाईन24 प्रतिनिधी:- कल्पेश कोरडे) : अहमदनगर परिसरातील तोफखाना विभागात राहणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार सर्वांसमोर उघडकीस  येताच सोमवार अहमदनगर मध्ये या भयानक कृत्याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संखेने मूक मोर्चा  काढण्यात आला.

सदरिल घटनेचे पडसाद मराठवाडा,जालना, नांदेड , औरंगाबाद व भिवंडी तालुक्यात सुद्धा बघायला मिळाले. दिनांक २५ सप्टेंबर रोजी मंगळवारी सकाळी १०:३० वा. पद्मानगर स्थित अखिल पद्मशाली समाज हॉल ते भिवंडी प्रांत अधिकारी कार्यालय असा थेट जवळ जवळ २५०० ते ३००० हजार शाळकरी मुल मुली पद्मशाली समाजातील जनसामान्य ते राजकीय, सामाजिक कार्यकर्ते तसेच हजारो भिवंडी वासियांनी या घटनेच्या निषेधार्थ मुक मोर्चात सहभागी होवून निषेध दर्शविला. यात प्रामुख्याने भिवंडी पद्मशाली समाज अध्यक्ष तसेच भिवंडी पूर्व आमदार महेश चौघुले ,रुपेश म्हात्रे तसेच सुमित कपिल पाटील स्थायी समिती सदस्य भिवंडी व इतर आजी माजी नगरसेवकांनी सुद्धा हजेरी लावली.
सदरिल घटने बाबत पद्मशालु समाजातर्फे १) आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी २) आरोपिस जो सहाकार्य करेल त्याच्यावरही F.I.R दाखल करावी. ३) या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करुन खटला फास्ट स्ट्रेक कोर्टात भरवावा.४) मुख्यमंत्री निधीतून तब्बल २५ लाखांचा मदत निधी तात्काळ जाहीर करुन पिडीत मुलीच्या शैक्षणिक खर्चाची गरज भागवावी. अश्या प्रकारच्या महत्त्वाच्या मागण्या प्रांत कार्यालयात निवेदन देताना पद्मशाली समाजाने केल्या.
   या मूक मोर्चात सर्वात मोठा सहभाग शाळकरी विद्यार्थ्यांचा होता, यात प्रामुख्याने
 1) P.T.highschool २)P.M.highschool 3)Vikas highschool 4)B.T.highschool
5)Shri.Vivekand highschool 6) Baba highschool 7)V.L.R.highschool

या सात शाळांचे तब्बल २५०० विद्यार्थ्यांनी पद्मानगर ते थेट भिवंडी प्रांत कार्यालयापर्यंत मूक मोर्चात सहभागी होवून अत्याचार झालेल्या मुलीच्या आम्ही सर्व सोबत आहोत हे त्यांच्या हातात धरलेल्या फलकांद्वारे व पोस्टर्स द्वारे आणि मुलांच्या एकचित्त शांततेने संपूर्ण भिवंडी शहराला दाखवून दिले.

Post a Comment

Previous Post Next Post