भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतिने  "शौर्य दिनानिमित्त मांडा-टिटवाळा परिसरातील भारतीय सैन्यातील सैनिक,माजी सैनिक अाणि त्यांच्या कुटुंबियांच्या घरी सदिच्छा भेट
————————————————————————————————————————



टिटवाळा  :  दि.२९ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला.भारताची मान संपुर्ण जगामध्ये अभिमानाने उंचावली.या अभिमानास्पद व ऐतिहासिक कामगिरी बद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वतिने संपुर्ण देशभर "सर्जिकल स्ट्राईक-२९ सप्टेंबर हा दिवस "शौर्य दिवस"* म्हणुन साजरा करण्यात अाला. या वर्षीपासुन दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला . अापल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे अाणि सार्वभौमत्वाचे प्राणपनाने रक्षण करणारा ,अापत्तीच्या काळात अापदग्रस्त देशबांधवांच्या मदतीलाही धावुन जाणारे,उन्हातान्हाची,थंडी पावसाची वा कोणत्याही संकटाची पर्वा नकरता अापली कर्तव्ये चोखपने बजावणारे देशाचे बहाद्दुर सैनिक हे अापल्यासाठी अादराचा अाणि अभिमानाचा विषय अाहे.
            म्हणूनच  या शौर्य दिनाच्या औचित्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे,भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या अादेशानुसार अाणि भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर,भाजपा जिल्हा सचिव तथा उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मांडा-टिटवाळा परिसरातील भारतीय सैन्यातील  सध्या कार्यरत असनारे सैनिक नवनाथ लावंड,माजी सैनिक बबन केदारे,रमापती त्रिपाठी,तातेराव फड,एकनाथ सावंत,बाजीराव महाडिक,कोनकर अाप्पा अाणि जेंद्रजी खरात यांच्या घरी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी यांनी उपहापौर उपेक्षा भोईर यांच्यासहित  सदिच्छा भेट दिली व त्यांच्या हस्ते " भारतीय सैन्यातील सैनिक/माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबांचा यथोचित सन्मान अाणि गौरव करण्यात अाला अाणी त्यांच्याशी  संवाद साधण्यात अाला.तसेच सैनिकानी सुध्दा सैन्यामध्ये असतानाच्या विविध अाठवणींना उजाळा दिला.पहिल्यांदा या देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांमुळे "वन रॅन्क वन पेंशन" योजनेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात पेंशन ची रक्कम वाढल्याची भावना व्यक्त करण्यात अाली.तसेच पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम सुरु केल्याचे व  घरी येऊन सदिच्छा भेट,संवाद अाणि कुटुंबासहित गौरव केल्यामुळे व अतिशय स्तुत्य कार्यक्रम चालु केल्याबद्दल  समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी उपमहापौर उपेक्षा भोईर,मोहने-टिटवाळा मंडळ मा.सरचिटणीस शक्तिवान भोईर,युवा मोर्चा प्रदेश सचिव परेश गुजरे,पुराणिक सर,अनिल फड,युवा मोर्चा जिल्हा सचिव देवेंद्र सावंत,जिल्हा सचिव वैभव पुजारी,जिल्हा उपाध्यक्ष गुरुनाथ भगत,सुरज गोरे,समाधान पाटील अाणि भुपेंद्र ससाणे यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post