रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ  कार्यकर्त्याना  युवक  आघाडी जिल्हाध्यक्ष जय जाधवांनी केले आर्थिक सहाय्य
डोंबिवली  :- ( शंकर जाधव  ) 


      पॅॅथरचा ढाण्या वाघ अशी ओळख  असणारे  व रिपब्लिकन पक्षाची धुरा वाहणारे कार्यकर्ते सी. आर. जाधव हे आजारी असल्याने त्याना डोंबिवली येथील इस्पितलात दाखल करण्यात आले आहे.रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे ( आठवले गट) युवक  आघाडी जिल्हाध्यक्ष जय जाधव यांनी आर्थिक सहाय्य केले. मंगळावरी रुग्णालयात सी. आर.जाधव यांची  रुग्णालयात भेट घेण्यासाठी कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या सोबत त्यांच्या पत्नी व रिपब्लिकन यवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जय जाधव सी. आर. जाधव  यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी आले होते. 

      सी. आर. जाधव यांची तब्बेत खालावल्याने त्यांना डोंबिवली पश्चिमेकडील डॉ. गांगुर्डे यांच्या स्पंदन हाँस्पिटल दाखल करण्यात आले आहे. सी. आर.जाधव यांच्या बाबत आठवणी  सांगतात प्रल्हाद जाधव म्हणाले कि,  आमचे रिपब्लिकन चलवलीचे व दलित पँथरचे डोंबिवलीतील ढाण्या वाघ ओळखले जाणारे सी. आर. जाधव  येथे रुग्णालयात  मध्ये दाखल केले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी फोन करुन जाधव यांची  भेट  घेऊन  चौकशी करावी असे सांगितले होते. सी. आर. जाधव हे तरूण वयापासून डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे काम करीत होते. आपल्या कार्याचे योगदान त्यांनी दलित पॅॅथर व रिपब्लिकन पक्षास दिले  आहे. डोंबिवलीतील आम्हा कार्यकर्त्याना त्यांचे नेहमी मार्गदर्शन लाभत असते.तरुण कार्यकर्त्याना माझी विनंती आहे कि, त्यांनी जाधव यांना मदत करावी. त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी अशी मी प्राथना करीत आहे. त्यांंच्या रुग्णालयाचे जेवढे बिल होईल ते मी भरीन.

Post a Comment

Previous Post Next Post