डोंबिवलीकर विद्याधर विठ्ठल भुस्कुटे यांच्या पदभ्रमणयात्रेस शिवसेनेकडून भगवा झेंडा ....
डोंबिवली :- दि. २९ ( शंकर जाधव )
डोंबिवलीतील विद्याधर विठ्ठल भुस्कुटे यांच्या साबरमती ते कन्याकुमारी ते शांतीनिकेतन या ७५ हजार कि.मी. पदभ्रमणयात्रेस शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना शहर शाखा डोंबिवली शहर व ग्रामीण वतीने सोमवारी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनेक पराक्रम करणा-या डोंबीवलीकर विद्याधर विठ्ठल भुस्कुटे यांचे नाव गिनिज बुकात आले पाहिजे.भुस्कुटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा अशी मागणी करणार शिवसेना करणार असल्याचे यावेळी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले.
यावेळी महापौर विनिता राणे , जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, आमदार सुभाष भोईर, शहरप्रमुख राजेश मोरे, महिला संघटक कविता गावंड, विद्याधर विठ्ठल भुस्कुटे,विंदा भुस्कुटे, प्रकाश म्हात्रे, सभापती दिपाली पाटील, पूजा म्हात्रे, किशोर मानकामे, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे ,सहाय्यक पोलिस उपायुक्त रविंद्र वाडेकर, वपोनी विजयसिंह पवार,जेष्ठ पत्रकार मंडलिक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्याधर विठ्ठल भुस्कुटे वयाच्या ६७ व्या वर्षी या प्रवासाला सुरुवात करीत आहेत. हि तिसरी पदभ्रमणयात्रा आहे. नागरिकरांकडून शुभेच्छा देत आहे असे महापौर विनिता राणे यावेळी म्हणाल्या. डोंबिवलीच्या शिरपेचात तुरा खोवण्याचे कार्य करित आहे.अनेक पराक्रम करणा-या विद्याधर विठ्ठल भुस्कुटे यांचे गिनिज बुकात नाव पाहिजे.लोकच यांच्याबद्दल पुस्तकें लिहितील.भुस्कुटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारा मिलावा अशी मागणी करणार असल्याचे आमदार सुभाष भोईर यावेळी म्हणाले.शिवसेनेच्या महिलांच्या वतीने भुस्कुटे यांचे औक्षण करून शाल व श्रीफळ देउन भुस्कुटे सत्कार करण्यात आला. `जय हिंद`, `भारत माता की जय` अश्या घोषणां देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पदभ्रमणयात्रेस मोठ्या उत्साहात सुरुवात केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले.
Post a Comment