पिंपरी गावातील ग्रामस्थांना जिझिया कर लागू......
विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी केला विरोध....
गेली चार वर्षे विविध कर चार- पाच पटीने वाढविल्याने गावकऱ्यांनी भरला नाही कर...
कल्याण तालुक्यातील पिंपरी गाव....
( प्रतिनिधी : शंकर जाधव )
कल्याण तालुक्यातील पिंपरी गावात साडे पाचशे घरे असून १५०० गोदामे आहेत. २००९ गावात ग्रामपंचायत अस्तिवात आली.२०१५ साली शासनाने करात ३० टक्क्यांप्रमाने वाढ करणे आवश्यक असताना महसूल खात्याने चार ते पाच पटीने वाढ केली.त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.शहरातील रेडीरेकनर प्रमाणे कर वाढ करण्यात आलीे असल्याने कराचा वाढीव बोजा गावकरी सहन करू शकत नाही.यावर पिंपरी गावात शुक्रवारी विशेष ग्राम सभा बोलाविण्यात आली होती.या सभेत वाढीव कर आकारणीला गावकऱ्यांनी कडाडून विरोध करत कोणत्याही परिस्थितीत कर भरणार नाही असा निर्धार सभेत एकमताने घेतला.\
ग्रामसभा सुरू झाल्यावर ग्रामसेवक तुषार पाटील यांनी गावकऱ्यांसमोर ४ कोटी ८ लाख रुपये असे मूळ अंदाजपत्रक सादर करून शासनाने चार वर्षांपूर्वीपासून लागू केलेल्या कराचा विषय काढताच ग्रामस्थ संतप्त झाले. यावर ग्रामसेवक यांनी सदर गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून सदर प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार असून त्यांचा निर्णय अंतिम राहील असे संगीतले.तर शिवसेनेने सरपंच सपना विश्वनाथ येदारकर यांनी गावाचा विकास या वाढत्या करप्रणालीमुळे थांबला असून याची माहिती कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना दिली असल्याचे सांगितले.तर माजी सरपंच तथा भाजप पदाधिकारी माधव जाधव यांनी यावेळी नवी मुंबई , कल्याण- डोंबिवली या शहरातील रेडीरेकनर प्रमाणे गावातील घरांना कर आकारण्यात आला आहे.कर भरल्यानंतर घराची मालमत्तेबाबतची कोणतेही पावती दिली जात नाही.सात बाऱ्यावर भोगवटादाराचे नावच ग्रामपंचायत कार्यालयात नोंद केली जात नसल्याचे सांगितले.
Post a Comment